Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

सायबर चोरट्यांनी कोथरूड, नांदेड सिटी तसेच बाणेर भागातील तीन ज्येष्ठ नागरिकांची वेगवेगळ्या घटनेत १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संसायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2026 | 08:30 PM
सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह जगभरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी कोथरूड, नांदेड सिटी तसेच बाणेर भागातील तीन ज्येष्ठ नागरिकांची वेगवेगळ्या घटनेत १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरूद्ध आयटी अॅक्ट तसेच फसवणूकीप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

कोथरूड भागातील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. १९ जून रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. गॅस बिल थकीत असून, ते न भरल्यास गॅस पुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी त्यांना एपीके फाईल पाठविली. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ४२ हजार रुपये काढून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.

तर, दुसऱ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने ४ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना बँकेकडून पेन्शन कार्ड देण्यात येणार आहे, अशी बतावणी करुन त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून पैसे काढून दुसऱ्या खात्यात वर्ग केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

तसेच, बाणेरमधील ज्येष्ठ नागरिकाची एपीके फाईल पाठवून ५ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केली. सायब चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठविली होती. ही फाईल उघडताच चोरट्यांनी खात्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक खिलारे तपास करत आहेत.

Web Title: An incident has occurred where cyber fraudsters have cheated three senior citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Theft Case

संबंधित बातम्या

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
1

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
2

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.