Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

पुणे शहरात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी पर्वती आणि सहकारनगर परिसरात शस्त्रधारी टोळक्याने अक्षरशः धुडगूस घातल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2026 | 02:27 PM
वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी पर्वती आणि सहकारनगर परिसरात शस्त्रधारी टोळक्याने अक्षरशः धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्राने तब्बल १९ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दिसेल ते वाहन फोडत टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेमुळे पहाटे झोपेत असलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

याप्रकरणी पर्वती व सहकारनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सोहम हरिष चौहाण (वय २०, रा. धनकवडी) याला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी नशेत किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपींच्या मागासाठी ४० सीसीटीव्ही तपासणी

युनिट दोनचे पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पथकातील तेजश्री पवार, कुंदन शिंदे, शंकर नेवसे, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी व त्यांच्या पथकाने आरोपींना पकडले. माहितीनुसार, आरोपींनी सुरुवातीला पर्वती गावठाण येथील ३ वाहनांना लक्ष्य केले. त्यानंतर हे तिघे सहकारनगरच्या दिशेने गेले. तळजाईन लेन क्रमांक तीन, तळजाई शेवटचा थांबा, स्मशानभूमी, राजमुद्रा सोसायटी व प्रिंग हिल सोसायटी परिसरात त्यांनी तब्बल १६ वाहनांची तोडफोड केली. हातातील शस्त्राने वाहनांच्या काचा आणि भागांची नासधूस करीत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. तोडफोडीच्या आवाजाने नागरिक जागे झाले आणि काहींनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सहकारनगर आणि पर्वती पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने या प्रकरणातील एका आरोपीला पकडले. तर त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. आरोपींचा माग काढण्यास परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तोडफोडीनंतर आरोपी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्याची माहितीही पोलिस तपासत आहेत.

टोळक्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई नेमकी कुठे ?

पुण्यात वाहनतोडीच्या घटना नवीन नाहीत. दहशत माजवण्यासाठी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरणारी टोळकी आणि अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग हा पोलिसांसमोरील गंभीर प्रश्न ठरत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई, हजेरी, समुपदेशन आणि सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करूनही वाहनतोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. यापूर्वी वाहनतोडी, जाळपोळ आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांवर मोक्का कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाईनंतरही त्याच प्रकारच्या घटना पुन्हा घडत असल्याने पोलिसांच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

टोळधाड कशी रोखणार ? 

हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या टोळक्यांची दहशत कायम

एकाच रात्रीत १९ वाहनांची तोडफोड; नागरिकांच्या मालमतेचे नुकसान

अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील सहभाग चिंताजनक

मोक्का कारवाईनंतरही टोळक्यांचा उपद्रव थांबेना

आरोपींची हजेरी, समुपदेशन आणि ताकीदीनंतरही पुन्हा गुन्हे

टोळक्यांच्या म्होरक्यांपर्यंत पोलिस कधी पोहोचणार?

नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

Web Title: An incident involving a gang vandalizing vehicles has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
1

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…
2

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?
3

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी
4

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.