संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या वादाच्या कारणावरून तरुणाला प्लास्टिक बकेट, नंबर प्लेट व दगडाने मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. येवलेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी प्रतीक दळवी, आर्यन एलवंडे, वेदांत जगताप (तिघे रा. चांबळी, ता. पुरंदर), सनी गावडे (रा. रावडेवाडी, ता. पुरंदर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कार्तिक लालासाहेब भिसे (वय २०, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गारवा हॉटेलसमोर, बोपदेव घाटाजवळ, येवलेवाडी येथे घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार थांबलेले असताना जुन्या वादातून आरोपींनी त्यांना घेरले. आर्यनने प्लास्टिक बकेटने, वेदांतने नंबर प्लेट व दगडाने, तर इतरांनी हाताने मारहाण केली. तसेच प्रतीक दळवी याने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून पोलिसांत तक्रार केल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं!; बारामतीत जय पवारांचा घणाघात
गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार
अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागे गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची भरदिवसा चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.७) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली आहे. रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. बोल्हेगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र चव्हाण हे सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात असताना त्यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींसोबत त्यांचा गाडीचा कट लागण्यावरून वाद झाला, असे सांगितले जाते. रागाच्या भरात या दोन अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांची चाकूने भोकसून हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.






