आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं!; बारामतीत जय पवारांचा घणाघात
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जय पवार यांनी स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या राजकीय वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली.
India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे
“दादांचा अपघात झाला, त्यावेळी त्यांच्याजवळ जनतेच्या कामांचीच कागदपत्रं होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेसाठीच काम करत होते. दादा गेल्यानंतर मी खूप विचार केला. राजकारण सोडावं, आईला वेळ द्यावा, असंही मनात आलं होतं. पण त्या १३ दिवसांत दादांवर जनतेचं किती प्रेम आहे, हे आम्ही जवळून पाहिलं. त्यानंतर ठरवलं की शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठीच काम करायचं,” असं जय पवार (Jay Pawar) म्हणाले.
“आपण दादांचे वारस आहोत. त्यांचं रक्त आपल्या शरीरात आहे. त्यामुळे जनतेसाठी जगायचं आणि दादांनी आयुष्यभर जपलेला जनसेवेचा विचार पुढे न्यायचा, हा आमचा निर्धार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती, अशी माहिती जय पवार यांनी दिली. “युगेंद्र पवार यांनीच सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी पार्थदादांनी स्पष्ट सांगितलं की, ‘युगेंद्र, आमचे कार्यकर्ते आम्हाला असं करू नका, असं सांगत आहेत. हे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं.’ त्यानंतरही आम्ही शेवटपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा ठेवली होती,” असं जय पवार यांनी सांगितलं.
Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर,
माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांवरही जय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “दादा गेल्यानंतर माळेगाव कारखान्याचं ७० कोटी रुपयांचं नुकसान झालं, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. त्यानंतर मी या विषयाची माहिती घेतली. मात्र, कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याची माहिती माझ्यासमोर आली,” असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.
“निवडणूक लढवायची असेल तर जरूर लढवा; पण वस्तुस्थितीच्या आधारावर लढा. उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू नका. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत. त्यांना काय खरं आणि काय खोटं, हे चांगलं कळतं. त्यामुळे सत्य फार काळ लपवता येणार नाही,” असा इशारा जय पवार यांनी दिला.
सोमेश्वर कारखाना हा सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला कारखाना आहे. त्यामुळे निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सभासदांचं हित, शेतकऱ्यांचा फायदा आणि कारखान्याचा विकास हेच महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली.






