
आधी डोक्यात दगड घालून हत्या, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला; अहिल्यानगरमध्ये खळबळ
सुभाष बाबासाहेब जगताप (वय ३५, रा. रतडगाव, ता. जि. अहिल्यानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमोल सोपान जाधव (रा. रतडगाव) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रतडगाव शिवारातील इनरकॉन कंपनीजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल जाधव याने अज्ञात कारणावरून सुभाष जगताप यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह रतडगाव येथील पुलाखाली नेऊन टाकला. मृतदेह पुलाखाली टाकून ही घटना अपघात असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी युवराज अंबादास जगताप (वय २८, मूळ रा. रतडगाव, सध्या रा. केडगाव) यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी अमोल जाधव याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीजवळील परिसरात घडलेल्या या घटनेमुळे रतडगाव आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खुनाचे नेमके कारण आणि घटनेमागील इतर बाबी तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
Ans: अहिल्यानगर तालुक्यातील रतडगाव शिवारात इनरकॉन कंपनीजवळ १५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.
Ans: सुभाष बाबासाहेब जगताप (वय ३५, रा. रतडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Ans: या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमोल सोपान जाधव (रा. रतडगाव) याला ताब्यात घेतले आहे. खुनामागील कारणाचा पोलिस तपास करत आहेत.