
अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीचा धक्कादायक बनाव उघड
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंडेरायवाडी परिसरातील डोंगराळ भागातील खोल दरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरात उलट सुलट चर्चेला उधान आले होते. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. मृत महिलेची ओळख पटवून पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांनी तातडीने तपास पथके तयार केली. तसेच फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यात आले.
चौकशीत पतीच्या संशयास्पद हालचाली आणि तपासातील धाग्यादोऱ्यांवरून हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर आरोपीने बेपत्ता झाल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न करणे आणि दरीकडे जाण्यापासून नातेवाइकांना रोखणे असे बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला सोमवार दि. २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपीचा बनाव असा आला उघडकीस
खून केल्यानंतर संशय टाळण्यासाठी आरोपीने साकूर येथील हॉटेलमध्ये मासे खात सीसीटीव्हीमध्ये दिसण्याचा प्रयत्न केला. घरी परतल्यावर शोध घेण्याचे नाटक केले, तर बिबट्याचा वावर असल्याचे सांगून नातेवाइकांना दरीकडे जाण्यापासून रोखले. मात्र, घटनास्थळावरील भौतिक पुरावे, फॉरेन्सिक तपासणी आणि पोलिसांच्या कसून चौकशीपुढे त्याचा बनाव टिकू शकला नाही.
Ans: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंडेरायवाडी येथील डोंगराळ परिसरात ही घटना घडली.
Ans: रामनाथ चाचण याने पत्नी मनीषा चाचण यांचा दोरीने गळा आवळून आणि दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली आहे.
Ans: घारगाव पोलिसांनी आरोपी रामनाथ चाचण याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.