Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

मुंढवा भागात रिक्षा चालक तरुणाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने भरवस्तीत बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, मुंढवा पोलिसांच्या अंसेवदनशीलतेचा नमुना मात्र, यावरून दिसून आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2026 | 12:30 AM
पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील मुंढवा भागात रिक्षा चालक तरुणाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने भरवस्तीत बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, मुंढवा पोलिसांच्या अंसेवदनशीलतेचा नमुना मात्र, यावरून दिसून आला असून, याप्रकरणात पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिस किती संवेदनशील आहेत, हेही यावरून स्पष्ट दिसत आहे.

याप्रकरणी पवन शिवाजी उबाळे (वय २७, रा. घोरपडी) असे मारहाण झालेल्या रिक्षाचालक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीचा प्रकार ७ ऑगस्ट रोजी दुपारी घोरपडी येथील बालाजीनगर येथे घडला आहे.

पवन उबाळे हे रिक्षा चालक आहे. स्वप्नील वाघमारे या तरुणासोबत त्याचे जुने वाद होते. या वादातूनच दुपारी उबाळेला स्वप्नीलने बालाजीनगर येथे भरवस्तीत अडविले. त्याला स्वप्नील व इतर तीन व्यक्तींनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. लाकूड तसेच बेल्टच्या पट्याने आणि हाताने मारहाण केली. चौघे मिळून त्याला मारहाण करत असताना या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र, त्याला कोणीही वाचविले नाही. नागरिक देखील तरुणांच्या या मारहाणीमुळे भयभित झाले होते. भरवस्तीत अन् दुपारी ही मारहाण झाल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

दरम्यान, या मारहाणीचा एक अडीच मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यातील मारहाण पाहिल्यानंतर प्रत्येक नागरिकामध्ये चिड निर्माण होत आहे. असे असताना मात्र, असंवेदनशील मुंढवा पोलिसांनी याप्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद करून हे प्रकरण मिटविले असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

Web Title: An incident involving the assault of a rickshaw driver has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.