संग्रहित फोटो
पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल फसवणूकीच्या एका गंभीर गुन्ह्यात अर्जुन उर्फ बंडू सखाराम तांबे हा पसार होता. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाने मंगळवारी मोहीम हाती घेतली होती. रात्री साडेआठच्या सुमारास अर्जुन तांबे मुकुंदनगरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अंमलदार श्रीकांत काळे आणि गिते यांना त्याच्या शोधासाठी पाठविण्यात आले. रात्री पावणे नऊच्या सुमारास दोघे तांबेच्या घराजवळ पोहोचले. घराबाहेर आलेल्या अर्जुनला पोलिसांनी आपली ओळख सांगून ताब्यात घेण्याचे कारण स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा : गोकुळच्या राजकारणात राहुल गांधींची एंट्री; भाजपला थेट इशारा, शेतकरी विसरणार नाहीत…
पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील भिडे पूल परिसरात ऐन गर्दीच्या वेळी जुन्या वादातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य मोहिते आणि आरोपी अल्पवयीन मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शौर्यला भेटण्यासाठी बोलावले होते. सोमवारी संध्याकाळी भिडे पुलाजवळील हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडला. शौर्य तेथे पोहोचल्यानंतर हल्लेखोरांचे टोळके त्याच्यासोबत काही वेळ बोलत थांबले. त्यानंतर तिघांच्या टोळक्याने अचानक त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात शौर्य गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
Ans: आरोपीने बनावट जमीनमालक आणि खोटी कागदपत्रे तयार करून एका कुटुंबाची १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली होती.
Ans: छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदनगर येथे रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हल्ला झाला.
Ans: या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. अर्जुन उर्फ बंडू तांबे आणि त्याचा मुलगा सोपान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.






