संग्रहित फोटो
सरफराज हा भुसावळ येथील एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतो. त्याची महिनाभरापूर्वी इन्स्टाग्रामवरून अश्विनी नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. रविवारी तो मुक्ताईनगरला घरी जात असताना दोघांचे मोबाईलवर बोलणे झाले. त्यानुसार फुलगाव उड्डाणपुलाखाली भेटण्याचे ठरले. सरफराज तेथे थांबलेला असताना सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी मागून येत त्याच्या डोक्यावर रॉडने प्रहार केला. तो खाली कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी हात व पायावरही मारहाण केली. त्यानंतर एकाने गावठी कट्ट्यातून खांद्यावर आणि पोटात गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जिल्हा रूग्णालयात शर्थीचे उपचार सुरू
जखमी सरफराजला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. गोविंदा बेलदार यांनी प्राथमिक उपचार केले. पोटातील गोळी खोलवर रुतल्याने ती काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
संशयितांच्या मागावर आहेत पोलिस पथके
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीची चौकशी केली आणि घटनास्थळी धाव घेतली. मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. जखमीच्या फिर्यादीवरून सात ते आठ अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ११८ (२), १८९ (४) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.
Ans: जखमी तरुणाचे नाव सरफराज सैय्यद सकीर सैय्यद (वय 24, रा. काझीपुरा, मुक्ताईनगर) आहे. तो भुसावळ येथे चालक म्हणून काम करतो. रविवारी 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता वरणगाव जवळील फुलगाव उड्डाणपुलाखाली हा हल्ला झाला. तो अश्विनी नावाच्या तरुणीला भेटायला आला होता.
Ans: 7 ते 8 अज्ञात हल्लेखोरांनी मागून येऊन सरफराजच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला, नंतर हात-पायावर मारहाण करून गावठी कट्ट्यातून खांद्यावर आणि पोटात दोन गोळ्या झाडल्या. पोटातील गोळी खोलवर रुतल्याने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात काढता आली नाही, त्यामुळे त्याला जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत.
Ans: वरणगाव पोलिसांनी जखमीच्या फिर्यादीवरून 7 ते 8 अज्ञातांविरुद्ध BNS कलम 109(1), 118(2), 189(4) आणि शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुक्ताईनगर SDPO यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.






