
Pune News: व्हायरल होण्याच्या नादात महामार्गच रोखला; नव्या गाडीच्या स्टंटबाजीने बनली वाहतूककोंडी
याप्रकरणी प्रकाश ज्ञानदेव कुसाळकर (वय ३५, रा. भाजी मंडई, येरवडा) आणि त्याच्या दोन साथीदारांवर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल रमेश विटकर (वय ३०, रा. शितळादेवी मंदिरामागे, सेवक चौक, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशनसमोरील गाडीतळ बसस्टॉप परिसरात फिर्यादी होते. आरोपींनी त्यांच्याकडे तंबाखू मागितली. तंबाखू देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. प्रकाश कुसाळकर याने बर्फ फोडण्याचा टोचा फिर्यादीच्या डोळ्याजवळ मारून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.
मारहाण करून बापाने मुलाला संपवलं
दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.