Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर होत असल्याच्या कारणावरून एका आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2026 | 05:30 PM
जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्...

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर होत असल्याच्या कारणावरून एका आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी १२:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास रावेत येथील कन्नू की चाय रेस्टॉरंटजवळ ते विश्रांतवाडी दरम्यान घडली आहे.

 

या प्रकरणात सूरज नाथाजी पाटील (वय ३१, रावेत, मूळ – पन्हाळा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाकांत तिवारी (किवळे), मुस्सा गौस शेख (देहूरोड) आणि तिवारी यांचा कारचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी मुस्सा गौस शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

किवळे येथील जमीन विकसित करण्यासाठी आरोपी आणि जागा मालक यांच्यात डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचे काम फिर्यादीच्या मध्यस्थीने सुरू होते. ॲग्रीमेंट करण्यास विलंब होत असल्याने आरोपींनी फिर्यादीला रेस्टॉरंटजवळ बोलावून दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला टोयोटा हायरायडर कारमध्ये बळजबरीने बसवून मारहाण केली आणि त्यांच्याकडून एचडीएफसी बँकेच्या कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. आरोपींनी फिर्यादीला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विश्रांतवाडी येथे सोडले. या प्रकरणाचा रावेत पोलीस तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या

बहिणीसोबत संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला कारने जोरदार धडक देऊन खाली पाडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी पाइपने डोक्यात घाव घालत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील बाजारतळ मैदानावर घडली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. नवनाथ दिगंबर सोनार (रा. वाघोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बाजारतळ मैदानात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालक रामेश्वर साहेबराव माने (वय ३५) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: An incident involving the kidnapping and assault of a person has occurred in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
1

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
2

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा
3

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.