Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

भवानी पेठ परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेपर ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2026 | 06:17 PM
भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या
  • भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या
  • डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भवानी पेठ परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेपर ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे.

 

आकाश उर्फ अक्या विठ्ठल पाटोळे (वय २९, रा. काशेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजय उर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत मृत आकाश याच्या वहिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि आरोपी अजय शिंदे हे भवानी पेठेतील एका सोसायटी परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात जवळच असलेल्या सिमेंटच्या पेपर ब्लॉकने आकाशच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि आरोपीच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी

Web Title: An incident involving the murder of a young man has occurred in punes bhavani peth nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर
1

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
2

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
3

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
4

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.