Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर चारचाकी चालक तरुणाची कार अडवून त्याच्याशी वाद घालण्याचा बहाणा करत चौघा चोरट्यांनी त्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील बागणी येथील ३४ वर्षीय तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 06:47 PM
बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

Follow Us
Follow Us:

पुणे : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर चारचाकी चालक तरुणाची कार अडवून त्याच्याशी वाद घालण्याचा बहाणा करत चौघा चोरट्यांनी त्याला मारहाण केली आहे. त्यानंतर कारच्या खिडकीतून हात घालून तरुणाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील बागणी येथील ३४ वर्षीय तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कारचालक असून तो आपल्या काकांसोबत कारमधून प्रवास करीत होता. दोघेही ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरून जात होते. त्यावेळी मार्गावर वाहनांची वर्दळ होती. याचवेळी एका वाहनातून आलेल्या चौघा आरोपींनी तक्रारदाराची कार अडवली. ‘गाडी बाजूला का घेतली नाही?’ असे म्हणत त्यांनी तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी चालक तरुणाला मारहाण केली.

दरम्यान, तक्रारदाराच्या काकांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता कारच्या आरशांची तोडफोड केली. त्यानंतर कारच्या खिडकीतून हात घालून चालकाच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि चौघेही वाहनातून पसार झाले.

हे सुद्धा वाचा : मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खिशातील एक हजारांची रोकड काढली; वानवडी पोलिसांत गुन्हा

वैदवाडी परिसरात तरुणाला हिसका मारून त्याच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अली बागवान (रा. फुले वस्ती, हडपसर) याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकेश लोरीक निषाद (वय ३०, रा. वेदूवाडी सिग्नल जवळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारी एकच्या सुमारास तक्रारदार त्रिलोक बार परिसरातून जात होते. त्यावेळी आरोपी अली बागवान याने त्यांना हिसका मारला. त्यानंतर त्यांच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि आरोपी तेथून पळून गेला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीचे नाव तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक मोकाटे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: An incident involving the robbery of a car driver has occurred on the mumbai bengaluru bypass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
2

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार
3

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ; 8 महिन्यातील आकडेवारी जाणून घ्या सविस्तर
4

Pune Crime : पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ; 8 महिन्यातील आकडेवारी जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.