Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ; 8 महिन्यातील आकडेवारी जाणून घ्या सविस्तर

पुण्यात खूनाच्या घटना आणि दरोड्यांमध्ये वाढ झाल्याने गंभीर गुन्हेगारीचा धोका कायम असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यंदा ७ ऑगस्टपर्यंत ६१ खुनाच्या घटना घडल्या. खूनाचा प्रयत्न, दुखापत, चैन स्नॅचिंग घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 02:39 PM
पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ; 8 महिन्यातील आकडेवारी जाणून घ्या सविस्तर

पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ; 8 महिन्यातील आकडेवारी जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन, रात्रीची गस्त, नाकाबंदी आणि गुन्हेगारांविरोधातील विशेष मोहिमांमुळे रस्त्यावरील गुन्हेगारीला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. खूनाचा प्रयत्न, दुखापत, चैन स्नॅचिंग व जबरी चोरीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट झाली आहे. विशेषतः जबरी चोरीच्या घटना तब्बल ९५ ने घट झाली आहे. मात्र, खूनाच्या घटना आणि दरोड्यांमध्ये वाढ झाल्याने गंभीर गुन्हेगारीचा धोका कायम असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असतानाच चालू वर्षातील सहा महिन्यांच्या आकडेवारीचे सुखावणारे चित्र आहे. पुणेकर अधून-मधून होणाऱ्या गोळीबार, कोयत्याने हाणामारी तसेच तोडफोडीने दहशतीत असतात. दुसरीकडे फटाका सायलेन्सर व त्यावरून अंधाऱ्या रात्री फिरणाऱ्या टोळक्यांमुळे देखील मनात धडकी भरलेली असते. अशा घटना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी जाणीवपुर्वक लक्ष केंद्रीत केले. सराईत गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिंग ऑपरेशन, संवेदनशील भागात रात्रीची गस्त, नाकाबंदी तसेच संशयितांची तपासणी अशा उपाययोजना सातत्याने राबविल्या. अचानक राबविलेल्या या मोहिमांचा परिणाम प्रामुख्याने रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांना लगाम लागण्यावर झाल्याचे दिसत आहे. शहरातील गुन्हेगारीचा सारासार विचार केला असता, पोलिसांच्या आकडेवारीतून यंदा अनेक गंभीर आणि रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः खूनाचा प्रयत्न, दुखापत, चैन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, दरोड्याच्या घटनांमध्ये यंदा वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

यंदा ७ ऑगस्टपर्यंत ६१ खुनाच्या घटना घडल्या. गेल्या दोन वर्षांत ऑगस्टपर्यंत अनुक्रमे ५२ आणि ५७ खुनांची नोंद झाली होती. त्यामुळे खुनाच्या घटनांमध्ये मात्र अपेक्षित घट झाली नसली तरी खूनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. यंदा आतापर्यंत ८२ घटना घडल्या असून, गेल्या वर्षी याच कालावधीत १०७ गुन्हे नोंदविले होते. दुखापतीच्या गुन्ह्यांमध्येही घट झाली असून, यंदा ८६२ घटना नोंदल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ९२३ होता. चैनस्नॅचिंगमध्ये यंदा ६४ घटना घडल्या असून, गेल्या वर्षी तब्बल १११ घटना नोंदल्या होत्या. जबरी चोरीतही १५२ घटना नोंदल्या असून, मागील वर्षी हा आकडा २४७ होता. मात्र, दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यंदा ऑगस्टपर्यंत सात दरोडे नोंदविण्यात आले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत चार घटना घडल्या होत्या. त्यामुळे स्ट्रीट क्राईममध्ये एकूणच घट दिसत असली तरी काही गंभीर प्रकार पोलिसांसाठी अद्याप आव्हान ठरत आहेत.

हे सुद्धा वाचा : नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुणे पोलीसः अपराध सांख्यिकी तुलना

गुन्ह्याचा प्रकार यंदा ( ऑगस्टपर्यंत) गेल्या वर्षी (ऑगस्टपर्यंत) फरक
खून ६१ ५७ +४
खूनाचा प्रयत्न ८२ १०७ २५
दुखापत ८६२ ९२३ ६१
दरोडा ७ ४ +३
चैनस्नॅचिंग ६४ १११ ४७
जबरी चोरी १५२ २४७ ९५

ठळक निरीक्षणे

खूनाचा प्रयत्न : सुमारे २३% घट

दुखापत : सुमारे ७% घट

चैनस्नॅचिंग : सुमारे ४२% घट

जबरी चोरी : सुमारे ३८% घट

दरोडा : ३ घटनांनी वाढ

खून : गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ ने वाढ

गोळीबाराने दहशतमय वातावरण..!

पुणे शहरात गेल्या वर्षांपासून सुरू असलेले दोन गँगमधील टोळी युद्ध अन् त्यामुळे निर्माण होणाऱ्या दहशतीसोबतच शहरात लहान मुलांकडून तसेच गुन्हेगारांकडून सतत होणाऱ्या गोळीबाराने दहशतीचे वातावरण कायम ठेवले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याचे देखील दिसत असून, गेल्या सात महिन्यात जवळपास ३० घटना घडल्या आहेत. दुसरीकडे पोलिस पिस्तूल तयार होणाऱ्या गावांसह तेथून आणणाऱ्या एंजटवर कारवाई करत असताना या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: There has been an increase in murder incidents in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

संभाजीनगर हादरलं! तरुणीचे अपहरण करून अत्याचार; अ‍ॅम्ब्युलन्समधून नेले अन्…
1

संभाजीनगर हादरलं! तरुणीचे अपहरण करून अत्याचार; अ‍ॅम्ब्युलन्समधून नेले अन्…

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल
2

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

Karnataka Crime : ‘तू जास्त पीस का खाल्ले?’ चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा
3

Karnataka Crime : ‘तू जास्त पीस का खाल्ले?’ चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…
4

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.