Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

मुलाने कोणतेही कारण नसताना जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हातातील गोल कड्याने तोंडावर प्रहार केल्याने संबंधित ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 04:30 PM
मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:
  • मुलाकडून आईला कड्याने मारहाण
  • ओठाला पडले ८ टाके
  • गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार
पुणे : राज्यासह देशभरात दररोज मारहाण, खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वडिलांकडून मुलाचा खून अन् मुलाकडून आईचा खून झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना पुणे शहरात ताज्या असतानाच, मुलाने कोणतेही कारण नसताना जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हातातील गोल कड्याने तोंडावर प्रहार केल्याने संबंधित ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या ओठाला तब्बल ८ टाके पडले आहेत.

याप्रकरणी आशा राजेंद्र सरोदे (वय ६०, रा. गोकुळनगर) यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांचा मुलगा राहुल राजेंद्र सरोदे (वय ३३, रा. गोकुळनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर येथील राहत्या घरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी राहुल याने शुल्लक किंवा कोणतेही ठोस कारण नसताना आईला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वतःच्या उजव्या हातातील लोखंडी गोल कड्याने आईच्या तोंडावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली असून उपचारादरम्यान डॉक्टरांना ८ टाके घालावे लागले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करत आहेत. दरम्यान, गेल्याच आठवड्यात वारजे परिसरात दारूच्या व्यसनाला बळी पडलेल्या मुलाशी झालेल्या वादानंतर पित्याने मुलाचा खून केल्याची घटना घडली होती.

हे सुद्धा वाचा : नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

मारहाण करून बापाने मुलाला संपवलं

दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.

Web Title: An incident has occurred in pune where a son assaulted his mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
1

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
2

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत
3

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ
4

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.