Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

तरुणाने दुकानदार महिलेला चाकूचा धाक दाखवत सलग चार दिवस घराबाहेर पडू दिले नाही. तसेच रोज घरासमोरुन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 27, 2026 | 11:43 AM
तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उधारीवर थंडपेय व सिगारेट देण्यास नकार दिल्या कारणावरुन दुकानदार महिलेला शिवीगाळ करुन दुचाकीची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यावर आणखीच संतापलेल्या तरुणाने दुकानदार महिलेला चाकूचा धाक दाखवत सलग चार दिवस घराबाहेर पडू दिले नाही. तसेच रोज घरासमोरुन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २१ जून ते २५ जून दरम्यान एन-१२ शताब्दीनगरात घडला आहे.

 

सनि कचरु गायकवाड (रा. शताब्दीनगर, एन-१२) असे महिलेला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विमलबाई कैलास कांबळे (४०, रा. शताब्दीनगर, एन-१२) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, फिर्यादी याच तक्रारीचा राग मनात धरून त्याच रात्री आरोपी पुन्हा दुकानासमोर आला. माझ्यावर पोलिस कारवाई झाली, आता तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे हातपाय तोडतो. व हर्मुल जेलला जावून बसतो, तु माझ्या पासून किती दिवस पळशील, अशी धमकी त्याने दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतरही महिलेने पुन्हा पोलिसांत धाव घेतली. २० आणि २१ जून रोजीही आरोपीकडून धमक्या व शिवीगाळ सुरूच राहिल्याने आणखी एन्सी दाखल केली.

हे सुद्धा वाचा : बहिणीसमोरच भावावर चाकूने केले सपासप वार; कॉलेज परिसरात हल्ला झाल्याने एकच खळबळ

चाकूचा धाक दाखवत घराबाहेर पडू दिले नाही

२१ जूनच्या रात्रीपासून २५ जूनपर्यंत आरोपी दररोज हातात चाकू घेऊन पीडितेच्या घरासमोर येत होता. बाहेर ये, तुला संपवून टाकतो, अशी धमकी देत तो घराबाहेर पडण्यापासून रोखत होता. सततच्या धमक्या आणि चाकूच्या धाकामुळे आपण चार दिवस घरातच अडकून पडलो, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अखेर २५ जून रोजी रात्री आरोपीची नजर चुकवत विमलबाई कांबळे यांनी पतीसह सिटीचौक पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार प्रमोद पवार करीत आहेत.

आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिसांत गुन्हा नोंद

१९ जून रोजी सकाळी सनी गायकवाड हा त्यांच्या दुकानात आला. त्याने थंडपेय व सिगारेट उधारीवर मागितले. मात्र, पैसे द्या आणि माल घ्या, असे सांगून पीडित महिलेने उधार देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सनी गायकवाड याने शिवीगाळ करत पीडितेला मारहाणीची धमकी दिली. तसेच दुकानासमोर उभी असलेल्या दुचाकीला (एमएच-२०-एफडी-१०७८) दगड मारून समोरील हेडलाईट फोडला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे.

Web Title: An incident involving threats made to a female shopkeeper has occurred in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.