Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

वाद-विवादातून पत्नीवर चाकूने सपासप वार करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 14, 2025 | 05:28 PM
पुणे हादरलं! पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

पुणे हादरलं! पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

पुणे : वाद-विवादातून पत्नीवर चाकूने सपासप वार करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसीमा मुल्ला (वय ३२), अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. चेंबूर, विष्णूनगर, मुंबई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश कचरु लंके (वय ३६, रा. ग्रॅव्हेंटाइन हाॅटेल, ज्युपिटर हाॅस्पिटलशेजारी, बाणेर) यांनी चतु:शृंगी (बाणेर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमजद मुल्ला टेम्पोचालक आहे. त्याची पत्नी नसीमा हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. नसीमाचे नातेवाईक बाणेर भागात राहायला आहेत. नसीमा आणि अमजद नातेवाईकांना भेटायला पुण्यात आले होते. बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये ते उतरले होते. सोमवारी (१३ जानेवारी) सकाळी दोघांमध्ये हॉटेलच्या खोलीत वाद झाले. नंतर अमजदने पत्नी नसीमावर चाकूने वार केले. अमजदने स्वत:च्या गळ्यावर, तसेच पोटावर चाकूने वार केले. दोघे जण गंभीर जखमी झाले.

हाॅटेलमधील खोलीत सुरू असलेला आरडाओरडा ऐकून कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. जखमी अवस्थेतील मुल्ला दाम्पत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात अमजदने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रीया; म्हणाले, सरकारने आता…

दगडाने ठेचून मुलाचा खून

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

Web Title: An incident of a husband stabbing his wife with a knife has come to light in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
2

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
3

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
4

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.