शाळेला लागलेल्या भीषण आगीत १७ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; अनेक विद्यार्थी गंभीर जखमी
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पूर्वश्रमीच्या प्रेयसीने भेटायला नकार दिल्यानंतर रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीच्या पतीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून दुचाकीला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात दुचाकी जळून खाक झाली आहे. आगीची धग लागून शेजारील आणखी एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. ही घटना रामटेकडी येथे गुरुवारी पहाटे ५ वाजता घडली आहे. वानवडी पोलिसांनी या प्रियकराला पकडले आहे. अहमद पठाण (वय ४०, रा. रामटेकडी) असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अहमद याच्याबरोबर एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. परंतु तिने पुढे त्याला नकार दिला. नंतर तिचा विवाह झाला. ती आपल्या संसारात असताना अहमद मात्र सतत तिला भेटायचा प्रयत्न करीत होता. बुधवारी ती आपल्या पतीसोबत एका लग्नाला गेली होती. त्यांच्या मागोमाग अहमद पठाण गेला. तेव्हा त्याचा तिच्या पतीबरोबर वाद झाला. तिने त्याला भेटायला नकार दिला. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास अहमद हा ती राहत असलेल्या सोसायटीत गेला. त्याने पतीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून तिला आग लावली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली. तर, या दुचाकीच्या शेजारील लावलेली दुसरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर वानवडी पोलिसांनी अहमद पठाणला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आला असल्याचे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित अदमाने यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : हा माज येतो कुठून? पुण्यात वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण; नेमकं काय घडलं?
वारजेतही दुचाकी जाळली
वारजेतील रामनगर भागात पार्क केलेली दुचाकी २० फुटावर नेहून ती जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अशोक शिंदे (वय ३७) यांनी तक्रार दिली आहे. नेमकी दुचाकी कोणत्या कारणाने जाळली, कोणी जाळली याबाबत पोलीस आता तपास करत आहेत.
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.