FIR on youth who misbehave in Road after RCB Win Cricket Match
शिक्रापूर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे दोन कारच्या झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी तपासासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने “मी पुण्याचा डॉन आहे” अशी ओळख सांगत वायरलेस मशीनही हिसकावली आहे. याप्रकरणी ऋषिकेश हरिषचंद्र गुंजाळ (वय 29, रा. पांडवनगर, गुंजाळवाडी, पुणे) याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, पुणे-नगर महामार्गावर दोन कारमध्ये अपघात झाल्यानंतर वाद निर्माण झाला. दोघांनीही डायल ११२ वर संपर्क साधल्याने शिक्रापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस कर्मचारी अपघाताची माहिती ११२ मशीनवर भरत असताना संशयित आरोपी ऋषिकेश गुंजाळ याने पोलिसाच्या हातातील मशीन हिसकावून घेत, “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवले, तुलाही संपवेल” असे म्हणत मोठ्याने आरडाओरड केली.
यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलून मारहाण केली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत गुंजाळ याला अटक केली असून, याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार करत आहेत. ऋषिकेश गुंजाळ याच्यावर शासकीय कामात अडथळा, पोलिसावर हल्ला व धमकी देणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.