Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताम्हिणी घाटातील खूनाचा झाला उलगडा, मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून; कारण…

ताम्हिणी घाटातील खूनाचा उलगडा करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले असून, मोठ्या भावानेच हा खून केला असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2025 | 12:30 AM
ताम्हिणी घाटातील खूनाचा झाला उलगडा, मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून

ताम्हिणी घाटातील खूनाचा झाला उलगडा, मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज खून, मारामाऱ्या लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटातील खूनाचा उलगडा करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले असून, मोठ्या भावानेच हा खून केला असल्याचे समोर आले आहे. व्यसनाधीन भावाशी वादविवाद झाल्यानंतर मोठ्या भावाने त्याचा खून केला आहे. ताम्हिणी घाटात हा मृतदेह आढळून आला होता. नंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून या खूनाचा उलगडा केला आहे.

ऋषिकेश अनिल शिर्के (वय २३, रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेशचा मोठा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (वय २६) याला अटक केली आहे. याप्रकरणी पौड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धेंडे, गुन्हे पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांच्या पथकाने केली आहे.

ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी बेवारस अवस्थेत तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मात्र, या मृतदेहाची ओळखही पटलेली नव्हती. पौड पोलिस तपास करत होते. याचदरम्यान, वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सचिन तरडे यांना माहिती मिळाली की, अनिकेतने लहान भाऊ ऋषीकेशचा ताम्हिणी घाटात खून केला आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अनिकेतचा शोध घेतला. अनिकेत कर्वेनगरमधील वनदेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीच्या परिसरात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लहान भावाचा खून केल्याची कबुली दिली.

अशी घडली घटना

अनिकेत आणि ऋषिकेश शुक्रवारी (२५ जुलै) रात्री कर्वेनगर येथून दुचाकीवरून रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील गोळवशी-शिर्केवाडी येथे देवदर्शनासाठी निघाले. दोघे मध्यरात्री ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ थांबले. ऋषिकेशला दारू आणि गांजाचे व्यसन होते. अनिकेतने ऋषीकेशला व्यसन सोडण्यास सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात अनिकेतने ऋषीकेशवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ऋषीकेशचा मृत्यू झाल्यानंतर अनिकेत पसार झाला. आरोपी अनिकेतला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाैड पोलिसांकडून याप्रकरणात तपास करण्यात येत आहे.

कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने हल्ला

कोथरुड भागातील गुरू गणेश नगर येथील मधुकुंज सोसायटीत १४ वर्षीय मुलावर जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन तरुणांसह एका अल्पवयीन आरोपीवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अर्जुन धोत्रे (वय १९, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरुड), पवन वाणी (वय १८) आणि एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह, आर्म अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident of elder brother murdering younger brother has taken place in tamhini ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित
1

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित

महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक
2

महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद
3

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
4

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.