Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद

चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील जळालेल्या मानवी अवशेषांचे गूढ उकलले! पोलिसांनी २४ तासांत मुख्य आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली. वाचा थरारक तपासाचा तपशील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 07:17 PM
चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

Follow Us
Follow Us:

 

  • चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
  • 24 तासांत खून प्रकरणाचा छडा
  • दोन आरोपी जेरबंद
चिपळूण तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत झाडाझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेल्या मानवी अवशेषांचा शोध लागल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत खून व पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत चिपळूण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रामपूर येथील डॉ. रावराणे यांनी त्यांच्या आंब्याच्या बागेजवळील दरीत काहीतरी संशयास्पद जाळल्याचे आणि त्या ठिकाणी लहान आकाराची हाडे पडलेली असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तेथे जळालेल्या स्वरूपातील अवशेष, हाडांचे तुकडे, अंगठी, रिंग व इतर वस्तू आढळून आल्या.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अधिक स्टाफ, मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी बोलावून घेतले. यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी आणि पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या हाडांच्या तुकड्यांबाबत कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला असता ती मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या गंभीर गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), २३८(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती, स्थानिक पडताळणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाशी संबंधित माहिती गोळा केली.

Vasai Crime: मित्र झाला वैरी! पैशावरून मित्राचा केला खून; वसईतल्या मृतदेहाचा झाला उलगडा

तपासात घटनास्थळाची जागा विशाल विजय खोडदेकर (वय २८, रा. रामपूर, ता. चिपळूण) याच्या मालकीची असल्याचे समोर आले. तो फरार असल्याचेही निष्पन्न झाले. याच दरम्यान मालाड पोलिसही त्याचा शोध घेत चिपळूणला आले होते, ही बाब समजताच पोलिसांचा संशय अधिक बळावला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत, म्हणजेच दि. ३१ मार्च रोजी रात्री १०.५० वा. चिपळूण पोलिसांनी विशाल खोडदेकर याला अटक केली. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) हिचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने तिलाही दि. १ एप्रिल रोजी सकाळी १०.३५ वा. अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. ६ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्ह्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी, हेतू आणि अन्य शक्य तितके धागेदोरे तपासले जात आहेत.

या प्रकरणात संशयास्पद जळालेल्या अवशेषांपासून सुरू झालेला तपास, वैज्ञानिक पुरावे, गोपनीय माहिती आणि जलद कारवाईच्या जोरावर अल्पावधीत आरोपींपर्यंत पोहोचण्याची कामगिरी चिपळूण पोलिसांनी करून दाखवली. त्यामुळे चिपळूण पोलिसांच्या दक्षता, समन्वय आणि तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Web Title: Chiplun police launch swift action murder case solved within 24 hours two accused apprehended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Chiplun
  • crime news

संबंधित बातम्या

Balumama Devasthan Scam:  आणखी एका मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश; बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींच्या गैरव्यवहार उघड
1

Balumama Devasthan Scam:  आणखी एका मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश; बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींच्या गैरव्यवहार उघड

इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्…
2

इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्…

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल
3

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या
4

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.