Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत बिबट्या हा अनुसूची-१ मधील संरक्षित प्राणी असून त्याचे अवयव बाळगणे व विक्री करणे पूर्णतः प्रतिबंधित आहे. संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2026 | 02:35 AM
महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने रचला सापळा
बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावला
पुणे-बेंगळुरू महामार्गावरील शिरोली एमआयडीसी परिसरात कारवाई

पुणे: बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावत सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) मोठी कारवाई केली असून दोन कातडी जप्त करत चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे-बेंगळुरू महामार्गावरील शिरोली एमआयडीसी परिसरात करण्यात आली. विश्वसनीय माहितीच्या आधारे रत्नागिरी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.

दोन कारमधून (किया सेल्टोस MH 48 BT 2424 आणि फोर्ड फिगो MH 12 HL 2610) बिबट्याची कातडी विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. पथकाने अडवण्याचा प्रयत्न करताच पांढऱ्या रंगातील फोर्ड फिगो कार चालकाने पळ काढला. मात्र त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती बॅगसह तिथेच सापडली. त्या बॅगेत शेपटी नसलेले एक बिबट्याचे कातडे आढळून आले.

दरम्यान, दुसरी कार असलेल्या मरून रंगाच्या किया सेल्टोसची झडती घेतली असता त्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून शेपटीसह दुसरे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले. दोन्ही कातडी आणि किया सेल्टोस कार पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आली असून एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Chandrapur News: 200 मृत्यूंनंतरही ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना कागदावरच; चंद्रपुरकरांचा संताप वाढला

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत बिबट्या हा अनुसूची-१ मधील संरक्षित प्राणी असून त्याचे अवयव बाळगणे व विक्री करणे पूर्णतः प्रतिबंधित आहे. संबंधितांवर या कायद्याच्या कलम ९, ३९, ४०, ४८अ, ४९ब व ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल वडगाव (कोल्हापूर) येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून जप्त कातडी वन विभागाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

अजिंठ्यात ग्रामस्थांचे धाडस! गोठ्यात घुसलेल्या नरभक्षक बिबट्याला केले जेरबंद; दुसऱ्या बिबट्याचा हल्ला थोपवला

चंद्रपुरकरांचा संताप वाढला

चंद्रपूर: मानव-बिबट्या संघर्षांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तयार करण्यात आलेली ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. गत पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांत सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद असताना, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आधारित ही योजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. या योजनेची संकल्पना मांडली. गावपातळीवर स्वच्छता, झाडी नियंत्रण, प्रकाश व्यवस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून बिबट्यांचा गावातील वावर कमी करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्याचा सुमारे ४२ टक्के भाग वनक्षेत्र असल्याने जंगलालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे.

Web Title: Police arrested four individuals involved in illegal trafficking of leopard skins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Forest Department
  • Leopard

संबंधित बातम्या

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
1

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप
2

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू
3

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ‘या’ परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर
4

बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ‘या’ परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.