Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निलंबित तलाठीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर येथे झालेल्या खळबळजनक गोळीबाराच्या घटनेचा गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात छडा लावला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2026 | 01:30 PM
COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

अमरावती : अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर येथे झालेल्या खळबळजनक गोळीबाराच्या घटनेचा गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात छडा लावला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, घरमालक तथा निलंबित तलाठी विपूल भानुदास ठाकरे यानेच स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणल्याचा बनाव रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली असून, मुख्य सूत्रधार विपूल ठाकरे पसार आहे. त्याचा शोध सुरू आहे.

रविवारी डायल-११२ वर अर्जुननगर येथील रहिवासी विपूल ठाकरे यांच्या घरावर बुरखाधारी दोन व्यक्तींनी देशी कट्टयाने गोळीबार केल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे गाडगेनगर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस ठाण्यात विविध कलमांसह आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेची सहा विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि अतूल वर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी नागपूर महामार्ग आणि वडाळी परिसरातून बादशाहसिंग टांक व अजय भोसले या दोघांना ताब्यात घेतले.

दीड लाखांची सुपारी

पोलिस तपासात विपुल भानुदास ठाकरे याने स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणण्यासाठी बादशाहसिंग टांक याच्याशी १ लाख ५० हजार रुपयांत व्यवहार ठरविल्याचे समोर आले. त्यापैकी १० हजार रुपये आगाऊ रक्कम चंद्रसिंग ऊर्फ शेरूसिंग याच्यामार्फत शूटरपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. विपुल ठाकरे याने स्वतः वर हल्ला झाल्याचा बनाव नेमका कोणत्या कारणासाठी रचला, याचे कारण त्याच्या अटकेनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात

चार आरोपी अटकेत

या प्रकरणात बादशाहसिंग अजाबसिंग टांक (वय ४२, सिकलकरीपुरा, वडाळी, अमरावती), अजय नुरजेम भोसले (वय ३१, राजुरा, अमरावती), राजासिंग अजाबसिंग टांक (३२, सिकलकरीपुरा, वडाळी, अमरावती) आणि चंद्रसिंग ऊर्फ शेरूसिंग जोधसिंग शाकला (३०, रा. फलौदी, राजस्थान; हल्ली मुक्काम अर्जुननगर, अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पसार आरोपी विपूल भानुदास ठाकरे (रा. अर्जुननगर, अमरावती) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोलंके, उपायुक्त श्याम घुगे आणि उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि पोलिस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे.

Web Title: An incident of gunfire at the home of a suspended talathi has occurred in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • firing

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.