Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ हादरलं! लाथाबुक्क्यांनी अन् काठीने मारहाण करुन एकाचा खून; कारणही आलं समोर

मावळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील पारवडी गावात दोघांनी मिळून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करत त्याचा खून केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2025 | 04:53 PM
धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या

धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता मावळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील पारवडी गावात दोघांनी मिळून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करत त्याचा खून केला आहे. ही घटना बुधवारी (दि. ५) रात्री उघडकीस आली आहे.

सागर बाबू रोकडे (वय ५२, रा. पारवडी, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोन्या उर्फ सुनील ऋषिनाथ काटकर व संकेत ऋषिनाथ काटकर (दोघे रा. पारवडी, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी पहाटे आरोपी आणि सागर रोकडे यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपींनी सागर यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करत ठार मारले. त्यानंतर सागर रोकडे यांचा मृतदेह त्यांच्या घरात आणून ठेवला. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सोन्या काटकर याला अटक केली आहे. कामशेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : गुन्हेगारांमध्ये खळबळ! माळेगाव पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; तिघांवर थेट तडीपारची कारवाई

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

ग्राहकाचा भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला

गेल्या काही दिवसाखाली खरेदी करताना झालेल्या वादातून ग्राहकाने भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत घडली आहे. मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्या ग्राहकाचे नाव आहे. या हल्ल्यात भाजी विक्रेते शौकत बाबामियाँ (वय ३६) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: An incident of killing a person by beating him with a stick has come to light in maval nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…
1

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
2

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

TVK Vijay Breaking: करूर घटनेवर विजयची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी त्यांना सोडून…”
3

TVK Vijay Breaking: करूर घटनेवर विजयची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी त्यांना सोडून…”

NCRB Report: ‘या’ राज्यात महिलांच्या विरोधात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद; NCRBचा धक्कादायक रिपोर्ट
4

NCRB Report: ‘या’ राज्यात महिलांच्या विरोधात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद; NCRBचा धक्कादायक रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.