Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्यामुळे राग अनावर; दोघांवर चाकूने सपासप वार केले अन्…

कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार केल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खोतवाडीतील आयोध्यानगर येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2025 | 02:41 PM
कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्यामुळे राग अनावर; दोघांवर चाकूने सपासप वार केले अन्...

कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्यामुळे राग अनावर; दोघांवर चाकूने सपासप वार केले अन्...

Follow Us
Follow Us:

इचलकरंजी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार केल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खोतवाडीतील आयोध्यानगर येथे घडली आहे.

अक्षय भरमा गौरोजी (वय ३०) व त्याचे वडील भरमा गौरोजी (दोघे रा. आयोध्यानगर) अशी जखमी झालेल्या दोघांची नांवे आहेत. याप्रकरणी श्रेयश जोशी व मंजिरी जोशी (दोघे रा. आयोध्यानगर) व अन्य एकजण अशा तिघांवर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरोजी व जोशी कुटुंबिय हे खोतवाडी (ता. हातकणंगले) आयोध्यानगर येथे शेजारी राहण्यास आहेत. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास श्रेयस व मंजिरी जोशी व श्रेयशचा मित्र या तिघांनी गौराजे यांच्या घरी जात कुत्रे भुंकल्याच्या कारणावरून माझ्या मुलास बोलतोस काय असे म्हणत अक्षय याची कॉलर पकडून कानशिलात मारली. तर श्रेयश व त्याच्या मित्राने त्यांना जिवंत सोडू नको, मारून टाक असे म्हणत चाकूने अक्षयवर वार केला. त्यामध्ये अक्षय याच्या डाव्या बाजूस बरगडीच्या खाली वार बसल्याने जखमी झाला. तर अक्षय याच्या बचावासाठी आलेल्या भरमा गौराजे यांच्यावरही श्रेयस व त्याच्या मित्राने चाकूने वार केल्याने तेही जखमी झाले. या प्रकरणी शहापूर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : बिजलीनगर झोपडपट्टीत तरुणाची हत्या; उजवा हात धारदार हत्याराने तोडला अन्…

भररस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार

स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे. मोक्का रिर्टन आणि सराईतांनी दहशत माजवून एकावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवत गोंधळ घातला. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉट येथे ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भक्तीसिंग दुधानी, शक्तीसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी याच्यासह सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता १०९, १८९, १८९(२), १९१(२), १९१(३), आर्म ४ (२५), मपोका ३७, (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आबा सरोदे (वय ३९) यांनी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: An incident of stabbing two people has occurred in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
1

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
2

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
4

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.