Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला; नेमकं काय घडलं?

किरकोळ वादातून वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना चतु:शृंगी तसेच धानोरी भागात घडली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 22, 2025 | 12:30 AM
पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला; नेमकं काय घडलं?

पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला
  • चतु:शृंगी आणि धानोरी भागातील घटना
  • पोलिसांनी केली मोठी कारवाई
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना चतु:शृंगी तसेच धानोरी भागात घडली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चतु:श्रृंगीमधील जनवाडीत लहानपणीचा मित्र बोलत नसल्यावरुन त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (१९ डिसेंबर) मध्यरात्री घडली आहे. चाकू हल्यात शिवा शिवशंकर सोनकांबळे (वय २५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी श्याम विटकर (वय २५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विटकर आणि सोनकांबळे हे लहानपणापासून मित्र आहेत. दोघांत वाद झाल्याने बोलत नव्हते. सोनकांबळे बोलत नसल्याने विटकर व साथीदाराने शुक्रवारी मध्यरात्री जनवाडी भागात त्याच्यावर चाकूने वार केले. सहायक निरीक्षक धामणे तपास करत आहेत.

धानोरीतही एकाच्या खुनाचा प्रयत्न

धानोरीतही किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. सचिन युवराज पवार (वय २०, रा. एकतानगर, विश्रांतवाडी) याने याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आयुष दीपक गायकवाड (वय १९), स्वप्नील उर्फ अभिनव सुनील गवळी (वय १९, दोघे रा. भीमनगर, विश्रांतवाडी) यांच्यासह सहा अल्पवयीनांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत शाम राजकुमार जाधव (वय २५, रा. कृण्णा आंगण सोसायटी, धानोरी), ओंकार उल्हास कांबळे (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, धानोरीतील आनंद पार्क भागात शुक्रवारी पहाटे आरोपी शेकोटी करुन गप्पा मारत थांबले होते. तेव्हा पाणी आणण्यावरुन आरोपी आणि तक्रारदार पवार, जाधव, कांबळे यांच्यात वाद झाला. यावरुन आरोपींनी पवार, जाधव, कांबळे यांना शिवीगाळ केली. जाधव, कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

Web Title: An incident of two people being attacked over a minor dispute has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.