Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या खोलीवर मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीला पत्नी व तिच्या मित्राने मारहाण केली, त्यानंतर मित्राने चाकूने हल्ला करुन पतीला गंभीर जखमी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 27, 2026 | 12:36 PM
पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्...; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्...; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या खोलीवर मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीला पत्नी व तिच्या मित्राने मारहाण केली, त्यानंतर मित्राने चाकूने हल्ला करुन पतीला गंभीर जखमी केले आहे. ही घटना २४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बजाजनगर परिसरात घडली आहे. मारहाण करणाऱ्या पत्नीसह चाकू हल्ला करणाऱ्या चेतन पोळ याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात किरण भगवान बागूल (३२, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पेंटिंगचे काम करतात. त्यांची पत्नी काजल या पाच महिन्यांपासून त्याच परिसरात त्या मुलांसह स्वतंत्र खोली घेऊन राहत आहेत. २४ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास किरण बागूल हे मुलांना भेटण्यासाठी पत्नीच्या राहत्या खोलीवर गेले. त्यावेळी तेथे चेतन पोळ हा उपस्थित होता. तू येथे कशासाठी आला आहेस, असा जाब बागूल यांनी चेतन पोळ याला विचारला. त्यावरून वाद झाला.

बागूल यांच्या पत्नी व पोळ याने फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर चेतन पोळ याने स्वयंपाकघरातील कांदा कापण्याच्या चाकूने किरण बागूल यांच्या डाव्या दंडावर वार करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच दोघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक

वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न

घोरपडे पेठ परिसरातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. नूर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी नूर शेख हा राज्यभरात गाजलेल्या वनराज आंदेकर मर्डर केस मधील महत्त्वाचा आयव्हिटनेस म्हणजेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याची चर्चा आहे. घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य हल्लेखोर सुजल परदेशी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत.

Web Title: An incident where a wife assaulted her husband has occurred in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
1

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात
2

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई
3

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
4

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.