Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

आयटी इंजिनिअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आहे. नंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 21, 2026 | 11:37 AM
आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्...; देहूगावातील घटनेनं खळबळ

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्...; देहूगावातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं
  • नंतर स्वत:वरही वार केले
  • देहूगावातील घटनेनं खळबळ
वडगाव मावळ/सतिश गाडे : आयटी इंजिनिअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आहे. नंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. देहूगाव येथे रविवारी (दि.20/9/2026) सकाळी 10:45 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. शुभांगी आकाश बारस्कर (वय 28, रा. देहूगाव, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय 26, रा. देहूगाव) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी  गस्तीवरील पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एकाला  मारहाण झाल्याची माहिती मिळाली. पोलीस दाखल झाले त्यावेळी आकाश रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. तर, दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शुभांगी गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून शुभांगी हिला मृत घोषित केले. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आकाशवर उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वर्षभरापासून वाद

आकाश हा आयटी इंजिनिअर असून हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत नोकरीला आहे. शुभांगी खासगी कंपनीत नोकरीला होती. दोघांचा डिसेंबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. चार ते पाच महिन्यांपासून ते ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते. प्राथमिक चौकशीत दोघांत वर्षभरापासून वाद सुरू असल्याचे समोर आले. याच वादातून आकाशने शुभांगीवर शस्त्राने वार केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून खाली उडी मारल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा : पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

Web Title: An incident where an it engineer murdered his wife has occurred in dehugaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Sucide News

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.