संग्रहित फोटो
पुणे : गोवा राज्याचा सदस्य तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून मिरविणाऱ्या तोतयाने शासकीय यंत्रणांनेला इशाऱ्यावर नाचवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हमजे, पोलिसांचे एस्कॉर्टींग घेण्यापासून त्यांची शासकीय सलामी देखील घेण्याचा प्रताप केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौगुले यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (रा. पिंपरी) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ ते २४ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे. मात्र गुन्हा १८ ऑगस्ट २०२६ रोजी दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले, आरोपी धर्मेंद्र सोनकर हा स्वतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र व गोवा राज्याचा सदस्य असल्याचे सांगत होता. त्याने २०२१ मध्ये आपल्या बनावट लेटर हेडवर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. तो पुण्यात आला असून, त्याला प्रोटोकॉल देण्यात यावा. २४ डिसेंबर २०२१ रोजी त्याने लोणावळा येथील शासकीय विश्रामगृहाचा अनधिकृतपने वापर केला. तसे पुणे ग्रामिण पोलिसांकडून एस्कॉर्टींग घेतले. त्याने काही विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठाका सुद्धा घेतल्या. एवढेच नाही तर त्याने पुणे ग्रामिण पोलिसांकडून सलामी घेतली.
दरम्यान, त्याची ही तोतयागिरी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या लक्षात आली. त्याने याबाबत पोलिसांना तसेच तो सांगत असलेल्या संबंधीत यंत्रणाकडून माहिती मागितली. त्यावेळी सोनकर हा तोतया असल्याचे समोर आले. पोलिसांनी देखील मागासवर्गीय आयोगाकडे या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केला. त्यावेळी आयोगाने लेखी पत्राद्वारे सोनकर हा आयोगाचा सदस्य नसल्याचे सांगितले. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.
सर्व शासकीय प्रोटोकॉल पुरविले
सर्वात गंभीर प्रकार म्हणजे एवढे दिवस तो मिरवत असताना, त्याने दिलेले लेटरहेड खरे आहे की खोटे, तो खरोखरच संबंधीत आयोगाचा सदस्य आहे की नाही हे एकदा पडताळून पाहण्याचे कष्ट संबंधीत यंत्रणांनी घेतल्याचे दिसून येत नाही. उलट त्याने दिलेल्या लेटरहेडची दखल घेत त्याला सर्व शासकीय प्रोटोकॉल पुरविण्यात आल्याचे दिसते. मात्र एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केलेल्या पाठपुराव्यात तोतयाचे अखेर भांडे फुटले.






