Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूज एमआयडीसीत एका पाईप सप्लायरची पुण्यातील उद्योजक पती-पत्नीने ९१ लाखांनी फसवणूक केली आहे. आता ही फसवणूक कशी झाली आहे बातमीमधून स्वीस्तर वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 26, 2025 | 02:46 PM
वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! (Photo Credit- X)

वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • वाळूज येथील उद्योजकाची फसवणूक
  • एक कोटींना गंडवले
  • पुण्याच्या उद्योजक पती-पत्नीवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वाळूज औद्योगिक वसाहतीतील के पी सेल्स कार्पोरेशन कंपनीकडून पाईप व फिंटीगचे साहीत्य खरेदी करून पुण्याच्या मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. संचालकांनी संगणमत करुन फसविण्याच्च्या उद्देशाने जाणीवपुर्वक व्यवहार असक्रीय असलेल्या बँकेचे चेक देऊन तसेच विश्वासघात करुन पैसे आज देतो, उद्या देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन ९१ लाख ८२ हजार ७८९ रुपयाची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पुण्याच्या उद्योजक पती-पत्नीवर २४ डिसेंबर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयराज बाबुराव पाटील (५३) यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत के. पी. सेल्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे.

सव्वादोन कोटींचे पाईप व फिटिंगच्या साहित्याचा केला होता पुरवठा

ही कंपनी टाटा व जिंदाल या कंपनीचे पाईप औद्योगीक क्षेत्रात सप्लाय व विक्री करते. २९ एप्रील २०२५ मध्ये पुणे येथील मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे मालक संचालक राहुल महीमकर व व त्यांची पत्नी प्रिती माहीमकर यांना जिंदाल या कंपनीच्या पाईपची आवश्यक्ता होती.
त्यामुळे दोघे पती-पत्नी हे जयराज पाटील यांच्या कंपनीत आले. त्यामुळे त्यांच्या आर्डर प्रमाणे त्यांच्या कंपनीला डीएमआयसी बिडकीन, पाँडेचेरी, धारवाड, कागल कोल्हापुर, चाकन पुणे, खोपोली या साईडवर पाईप असे एकुण २ कोटी २६ लाख ८२ हजार १९० रुपयाचे पाईप व फिंटीगचे साहीत्य सप्लाय केले. त्यावर त्यांनी जयराज पाटील यांना १ कोटी ३४ लाख ९९ हजार ४०१ रुपये के.पी. सेल्स कॉर्पोरेशनच्या खात्यावर ट्रांन्सफर केले. बाकी रक्कम ९१ लाख ८२ हजार ७८९ रुपये दिले नाही. त्यामुळे जयराज पाटील यांनी राहुल माहीमकर व त्याचे पार्टनर प्रिती माहीमकर यांना कॉल केले.

हे देखील वाचा: अडीच हजारांची लाच घेणं भोवलं; आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले

फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न, पण केली टाळाटाळ

परंतु त्यांनी फोन उचलले नाही. संपर्क झाल्यानंतर त्यांनी कळविले की, मला संबंधिताकडून पैसे मिळाले नाही. त्यांच्याकडून पैसे आले तर मी तुम्हाला देतो. त्यामुळे ज्या साईडवर माल सप्लाय केला, त्यांच्याकडे जयराज पाटील यांनी खात्री केली असता समजले की, मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. चे सचांलक राहुल माहीमकर व प्रिती माहीमकर यांना त्यांचे पैसे मिळाले. परंतु त्यांनी जयराज पाटील यांचे पैसे देले नाही. याप्रकरणी जयराज पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. संचालक राहुल माहीमकर व प्रिती माहीमकर यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवेगळ्या बँकांचे दिले धनादेश

जयराज पाटील यांनी व्यवहाराची रक्कम देण्याबाबत माहीमकरकडे विचारणा केली असता, त्यांनी ऍक्सीस बँकेचे ६ धनादेश सेक्युरीटी म्हणून दिले. मात्र ऍक्सीस बँकेत व्यवहार असक्रीय असल्याने तुम्ही असक्रीय व्यवहाराचे बँकचे चेक का दिले? असे विचारल्यावर माहीमकर यांनी कोटक महींद्रा बँकेचे ६ धनादेश दिले. ते बँकेत वटविण्यासाठी टाकले असता रक्कम पुरेशी नसल्याने चेक अनादरीत झाले. त्यानंतर पुन्हा राहुल माहीमकर यांनी आयसीआयसीआय बँकेचे ६ धानदेश दिले. ते वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, राहुल माहीमकरच्या खात्यावर रक्कम पुरेशी असतांनासुध्दा माहीमकर याने बँकेत कळविले की, पेमंट थाबवून धनादेश परत करण्यास सांगितले.

हे देखील वाचा: स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; ‘या’ ठिकाणी घडला अपघात

Web Title: An industrialist from waluj was defrauded of 91 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या
1

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न
2

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
3

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली
4

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.