Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ मारहाणप्रकरणी तरुणाकडून प्रतिज्ञापत्र सादर; गजा मारणेने चिथावणी…

मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त कोणीही घटनास्थळी हजर नव्हते, आरोपींनी कोणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नाही, असे तक्रारदार तरुणाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 04, 2025 | 12:43 PM
'त्या' मारहाणप्रकरणी तरुणाकडून प्रतिज्ञापत्र सादर; गजा मारणेने चिथावणी...

'त्या' मारहाणप्रकरणी तरुणाकडून प्रतिज्ञापत्र सादर; गजा मारणेने चिथावणी...

Follow Us
Follow Us:

पुणे : गुंड गजा मारणे टोळीच्या सराइतांकडून आयटी कर्मचारी मारहाण प्रकरणात “आपल्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना कोणीही चिथावणी दिली नसल्याचे” प्रतिज्ञापत्रच तक्रारदार आयटी कर्मचाऱ्याने सोमवारी विशेष न्यायालयात सादर केले. ‘मस्ती आली आहे, साल्याला मारा,’ अशा शब्दांत तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना गजानन मारणे याने चिथावणी दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त कोणीही घटनास्थळी हजर नव्हते, आरोपींनी कोणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नाही, असे तक्रारदार तरुणाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

कोथरूड येथील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील काही सराईतांनी देवेंद्र जोग या तरुणाला (दि.१९ फेब्रुवारी) मारहाण केली होती. याप्रकरणी प्रथम मारहाणीचा गुन्हा नोंद केला. नंतर मात्र गंभीर दखल घेत यात खुनाच्या प्रयत्नाचे कलम वाढ केले आणि पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली. तर रुपेश मारणे आणि बाब्या पवार हे आरोपी फरार आहेत.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गजानन मारणे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. गजानन मारणे याने साथीदारांना तक्रारदार तरुणाला भर चौकात जिवे मारण्यासाठी चिथावणी दिली, असा दावा पोलिसांनी केला होता. नंतर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी आरोपी गजानन मारणेला ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा आरोपींना पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेतले. मारणेच्या कोठडीची मुदतही संपली. त्यामुळे या चौघांनाही पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केले होते.

‘दबाव-दहशतीला बळी न पडता…’

ही घटना तत्कालिक कारणाने व गैरसमजुतीने झाली असून, मला मारहाण करणाऱ्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दिली होती. मारहाण करण्यापूर्वी, मारहाण होताना व झाल्यानंतर कोणत्याही लोकांनी कोणतीही चिथावणी दिलेली नाही. मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त इतर कोणीही घटनास्थळी हजरही नव्हते. ही घटना क्षणिक रागातून झालेली असून, माझ्या समक्ष कोणाच्याही सांगण्यावरून आरोपींनी मला मारहाण केलेली नाही. हे प्रतिज्ञापत्र कोणत्याही दबावाला अथवा दहशतीला बळी न पडता न्यायालयात स्वखुशीने सादर करत आहे,’ असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

गजानन मारणेला न्यायालयीन कोठडी

आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, तसेच फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकारी सहायक आयुक्त गणेश इंगळे व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. बचाव पक्षातर्फे अड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. आरोपी गजानन मारणे घटनास्थळी हजर नव्हता, त्यामुळे त्याने चिथावणी देण्याचा प्रश्नच येत नाही. तक्रारदारानेही वकिलामार्फत हजर राहून त्याला पुष्टी दिली आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने गजानन मारणेला न्यायालयीन कोठडी सुनावली, तर अन्य तीन आरोपींच्या कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ केली.

Web Title: An it employee in pune has submitted an affidavit in the court and made a sensational claim nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Court
  • crime news
  • Gaja Marne
  • maharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या
1

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

Madhya Pradesh : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू
2

Madhya Pradesh : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार
4

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.