Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाकी वर्दीला काळिमा! SRPF जवानाने पोलीस गणवेशातच सोनपेढीला घातला सव्वा दोन लाखांचा गंडा

SRPF Jawan Fraud Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका SRPF जवानाने वर्दीचा गैरवापर करून बाफना ज्वेलर्सची २.४९ लाखांची फसवणूक केली. चोरीचे सोने विकून सोनपेढीला गंडा घालणाऱ्या या जवानावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 03:18 PM
SRPF जवानाने पोलीस गणवेशातच सोनपेढीला घातला सव्वा दोन लाखांचा गंडा (Photo Credit- AI)

SRPF जवानाने पोलीस गणवेशातच सोनपेढीला घातला सव्वा दोन लाखांचा गंडा (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पोलीस गणवेशाचा गैरवापर करत सोनपेढीला सव्वा दोन लाखांचा गंडा
  • SRPF जवानाचा प्रताप
  • सात वर्षांनंतर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Crime News: राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने आपल्या पदाचा आणि गणवेशाचा गैरवापर करून एका ज्वेलर्स दुकानाची तब्बल २ लाख ४९ हजार ३३३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आईच्या उपचारासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याचे भासवून त्याने चोरीचे सोने या सोनपेढीला विकले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्दीचा दाखला अन् ‘खोट्या’ आईची माया

मिळालेल्या माहितीनुसार, मे. आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या (आकाशवाणी चौक शाखा) व्यवस्थापक विनोदकुमार दिलीपसिंग चौधरी (६१, देवळाई रोड) याप्रकरणी तक्रार दिली आहे. १५ मे २०१८ रोजी संशयित आरोपी योगेश सुरेश सिंगणारे (रा. एसआरपीएफ कॅम्प, सातारा, छत्रपती संभाजीनगर) हा पोलीस गणवेशात सोनपेढीवर आला होता. त्याने आपले पोलीस ओळखपत्र दाखवून व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला. आपल्या आईच्या आजारपणासाठी तातडीने पैशांची गरज असून पत्नीचे जुने मंगळसूत्र विकायचे आहे, असे त्याने सांगितले.

सोनपेढीने ठेवला विश्वास

सोनपेढीने त्याच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदा ६१, ४८४ रुपयांचे दागिने खरेदी केले आणि रक्कम त्याच्या बैंक खात्यात ऑनलाइन जमा केली. त्यानंतर त्याने १५ मे २०१८ ते २४ ऑगस्ट २०१८ या कालावधीत वेळोवेळी गणवेशात किंवा ओळखपत्र दाखवून सोनपेढीला भेट दिली. वेगवेगळ्या नातेवाईकांचे सोने असल्याचे सांगून त्याने एकूण २,४९,३३३ रुपये पदरात पाडून घेतले. ही सर्व रक्कम सोनपेढीने त्याच्या बँक खात्यावर ऑनलाइन वर्ग केली होती.

हे देखील वाचा: Sambhajinagar Water Crisis: धरण उशाला अन् कोरड घशाला…. वीजपुरवठा खंडित, शहरात पुन्हा जलसंकट

पोलिस तपासात सत्य आले समोर

१८ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस अधिकारी योगेश सिंगणारेला सोबत घेऊन सोनपेढीवर आले, तेव्हा व्यवस्थापनाला धक्का बसला. सिंगणारेने विकलेले सोने हे चोरीचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. नियमानुसार खरेदी-विक्रीचे व्यवहार केलेले असतानाही, आरोपीने चोरीचे सोने विकल्यामुळे पोलिसांनी सोन्याच्या सहा लगडी जप्त केल्या. यामुळे सोनपेढीचे पैसे आणि सोने दोन्ही गेल्याने मोठी फसवणूक झाली.

ज्वेलर्सची न्यायालयात धाव

याप्रकरणी सोनपेढीने सुरुवातीला वकिलामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, सातारा पोलिसांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी योगेश सुरेश सिंगणारे विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४२० (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा: कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा! जिल्हा रुग्णालयात ‘मोफत किमोथेरपी’ सुरू; खासगीतील महागड्या उपचारांतून सुटका

Web Title: An srpf jawan while in police uniform defrauded a gold shop of over two lakh rupees in sonpeth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त
1

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…
2

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; सूर्यकांत येवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
3

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; सूर्यकांत येवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Bandu Andekar Arrest : बंडू आंदेकरला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक; नेमकं प्रकरण काय?
4

Bandu Andekar Arrest : बंडू आंदेकरला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.