Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andharapradesh Crime: टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून पत्नीचा संताप; पतीवर चाकूने सपासप केला वार अन्….

आंध्र प्रदेश मधील मंगळागिरी येथे टीव्हीचा आवाज कमी करण्याच्या वादातून पत्नीने 27 वर्षीय शेख अहमद यांच्यावर चाकूने हल्ला केला. विजयवाडा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 12:53 PM
कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

Follow Us
Follow Us:
  • टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून वाद
  • पत्नीने चाकूने सपासप केला वार
  • विजयवाडा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
आंध्रप्रदेश: आंध्रप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 27 वर्षीय विवाहित तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्याची पत्नीचं आहे. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव 27 वर्षीय शेख अहमद असे आहे. शेख अहमद हे व्यवसायाने एसी मेकॅनिक होते आणि पत्नीसमवेत राहत होते. टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून वाद झाला आणि या वादातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. हि धक्कदायक घटना आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील मंगळागिरी येथील टिडको गृहनिर्माण वसाहतीत घडली.

काय घडलं नेमकं?

घटनेच्या दिवशी अहमद यांनी पत्नीला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले. मात्र या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात पत्नीने घरातील चाकू उचलून अहमद यांच्यावर सपासप वार केले. हा वार एवढा जोरदार होता की रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा शेजार्यांना अहमद रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. शेजाऱ्यांनी अहमदला तातडीने विजयवाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तलवारीने केक कापणे पडलं महागात; बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

पोलिसांनी अहमदच्या पत्नीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून ही घटना घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नाशिकमध्ये पत्नीबद्दल वाईट भावना ठेऊन अपशब्द वापरल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केला. इगतपुरी तालुक्यातील वाडीव येथील पिंपळगाव डुकरा शिवारातील गिऱ्हेवाडी येथे ही घटना घडली.

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारातील अनिल एकनाथ गिरे (रा. गिडेवाडी) याचा खून झाला असल्याची घटना शुक्रवार (दि. २०) उघडकीस आली. वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, पोलीस हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज येशी, भगवान खरोले, धोंडीराम बोंबले, विशाल सोनवणे यांनी दोन तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.

Beed Crime: 21 जानेवारीपासून बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध लागला, मात्र अल्पवयीन गरोदर असल्याची धक्कादायक माहिती; काय घडलं नेमकं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्यावरून वाद झाला.

  • Que: हल्ला कसा करण्यात आला?

    Ans: पत्नीने घरातील चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

  • Que: पीडिताचा मृत्यू कसा झाला?

    Ans: गंभीर जखमांमुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Andhra pradesh crime wifes anger over tv volume reduction husband stabbed with knife and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….
1

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…
2

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
3

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी
4

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.