संग्रहित फोटो
पुणे पोलिसांनी हत्यारांचा वापर करून रस्त्यावरच केक कापत दहशत पसरविण्याचे गुन्हेगारी कृत्य करू नये, अशा वारंवार सुचाना दिल्या आहेत. दरम्यान, एका इन्स्ट्राग्राम अकाउंटवर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओत धारदार तलवारीनी केक कापून नंतर तलवार हवेत नाचवून दहशत पसरविल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान हा वाढदिवस हडपसर येथील शेवकर वस्ती, लक्ष्मीनगर येथील यल्लाम्मा मंदिराजवळ रस्त्यावर साजरा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार, तेथील नागरिकांकडे विचारपूस केली असता दिनांक १७ फेब्रुवारी रात्री नऊच्या सुमारास वाढदिवस साजरा केला. धारदार तलवारीने केक कापून नंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी दहशत पसरविल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बड्डे बॉय आणि त्याच्या साथीदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
स्वारगेट येथील महर्षीनगरमध्ये सोसायटीच्या अवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुलेट चालकासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, बुलेट चालकासह साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे महर्षीनगर भागातील सोसायटीत राहायला आहेत. आरोपी बुलेट चालक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आला. त्याने जोरात बुलेटचा हॉर्न वाजविला. बुलेटचा कर्णकर्कश हॉर्नमुळे त्रासलेल्या ज्येष्ठाने विचारणा केल्यानंतर बुलेट चालकाने त्यांना शिवीगाळ केली. नंतर बुलेट चालक आणि साथीदार सोसायटीच्या आवारात आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. त्यांना लाथाबुक्क्या, तसेच बॅटने मारहाण केली. सहायक निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.






