Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arun Gawli News: अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची तुरूंगातून सुटका; ‘या’ प्रकरणात भोगली १८ वर्षांची शिक्षा

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 03, 2025 | 02:10 PM
Arun Gawli News:

Arun Gawli News:

Follow Us
Close
Follow Us:
  • अरूण गवळीची नागपूर कारागृहातून सुटका
  • २००४ मध्ये मुंबई विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • दीर्घ तुरुंगवास आणि त्याचे वयामुळे जामीन मंजूर

Arun Gawli News:  गेल्या १८ वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहाच्या मागच्या गेटने मीडियापासून लपवत पोलिसांनी अरुण गवळीची सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली होती.

अरुण गवळी २००४ मध्ये मुंबई विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने २००७ मध्ये मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर त्यांना नागपूर तुरुंगात पाठवण्यात आले. न्यायालयाने त्यांना १७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

Maduro Bounty : व्हेनेझुएलावर अमेरिकेचा दबाव हा फक्त ड्रग्जमुळेच की यामागे आहे काही छुपा अजेंडा? वाचा सविस्तर…

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायाधीश एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्याचा दीर्घ तुरुंगवास आणि त्याचे वय विचारात घेतले. त्यानंतर, न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने ठरवलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून गवळीला जामीन मंजूर केला. गेल्या १८ वर्षांपासून तो जामिनासाठी प्रयत्न करत होता.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे त्यांची सुटका करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्यात गवळी यांची बाजू अ‍ॅड. शंतनु आडकर यांनी मांडली. कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अरुण गवळी यांना अटक झाली होती. त्यावेळी ते आमदार होते. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एका राजकीय नेत्याच्या खूनप्रकरणी आमदाराला झालेली ही शिक्षा त्यावेळी मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती.

दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, जनजीवन विस्कळीत

जामसंडेकर यांची हत्या

२ मार्च २००७ रोजी सायंकाळी घाटकोपर येथील असल्फा व्हिलेजमधील रुमानी मंझील चाळीत राहत्या घरात टीव्ही पाहत असताना शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, सहआरोपी सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

हत्येमागील राजकीय पार्श्वभूमी

मुंबई महापालिका निवडणुकीत कमलाकर जामसंडेकर यांनी अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे उमेदवार अजित राणे यांचा अवघ्या ३६७ मतांनी पराभव केला होता. या पार्श्वभूमीवरच काही महिन्यांतच जामसंडेकर यांची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्या वेळी गवळी आमदार होते. एखाद्या राजकीय नेत्याच्या खून प्रकरणी आमदाराला झालेली जन्मठेप ही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.

Web Title: Arun gawli news underworld don arun gawli released from jail served 18 years in prison in this case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

मिनीबसचा चालकच निघाला चोर, सीसीटीव्ही फुटेजमधून उघड; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

मिनीबसचा चालकच निघाला चोर, सीसीटीव्ही फुटेजमधून उघड; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल
2

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक
3

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक

पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या
4

पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.