Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी

२०१८मध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह विहिरीत आढळला. अनेक महिने तपास सुरू राहिला, अखेर दुसऱ्या प्रकरणातील जबाबातून तपासाची दिशा बदलली आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 16, 2026 | 04:29 PM
Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी

Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी

Follow Us
Follow Us:
  • ७० वर्षीय आरोपीला फाशी
  • आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल
  • दोन अत्याचार प्रकरणांत जन्मठेप
आटपाडी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात विटा सत्र न्यायालयाने ७० वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. शिवाजी कोंडीबा काळेल (रा. गळवेवाडी, ता. आटपाडी) असे दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याचबरोबर अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन स्वतंत्र प्रकरणांत त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी बाजू मांडली.

विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह

आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी परिसरातून ७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी चारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गळवेवाडी येथील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याचे तसेच तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी हत्या आणि अत्याचाराच्या दिशेने तपास सुरू केला.

हेही वाचा: Mumbai Fire News: मुंबईत रुग्णालयाच्या टेरेसवर गॅसचा भडका; अचानक लागलेल्या आगीत २ कर्मचारी गंभीर भाजले

दुसऱ्या प्रकरणातून लागला सुगावा

घटनेनंतर सुरुवातीचे सुमारे सहा महिने आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, २६ जुलै २०१८ रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी काळेलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पीडित मुली आणि त्यांच्या आईचे न्यायालयात कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आले. या जबाबातून ७ जानेवारी रोजी मृत मुलीसोबत आरोपी असल्याची माहिती तपास यंत्रणेस मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दिशेने तपासाला वेग दिला आणि काळेलला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आले.

पुरावे ठरले महत्त्वाचे

तपासादरम्यान आरोपीने मृतदेह लपवण्याचा आणि नंतर तो विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. लोखंडी कणगी आणि चादर यांसह अन्य वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. चादरीवर आढळलेली टिकली पीडित मुलीच्या आजी-आजोबांनी ओळखली. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात लोखंडी कणगीत मानवी रक्ताचे अंश आढळल्याचे स्पष्ट झाले. या पुराव्यांसह साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुरावे खटल्यात महत्त्वाचे ठरले.

हेही वाचा:Crime News: १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; खोलीत आढळलेल्या चिठ्ठीने तपासाला नवी दिशा,अभ्यासाचा ताण की…

१९ साक्षीदारांची साक्ष

या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १९ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने शिवाजी काळेलला अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. २०१८मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा निकाल तब्बल काही वर्षांनी लागला असून, विटा सत्र न्यायालयाच्या या निर्णयाकडे आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

Web Title: Atpadi minor girl murder case death penalty shivaji kalel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Sangali News

संबंधित बातम्या

Crime News: लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे  लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच मारहाण
1

Crime News: लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.