Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! पुण्यात ATS कडून 65 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई; तब्बल 50 जणांची पोलिसांकडून चौकशी

पाकिस्तानात असलेल्या कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्क असल्याच्या संशयावरून एटीएसने चिपळूणमधील एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2026 | 07:54 AM
एटीएसचे पुण्यात ६५ ठिकाणी छापे

एटीएसचे पुण्यात ६५ ठिकाणी छापे

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने जिल्ह्यातील ६५ ठिकाणी अचानक छापेमारी केली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यासह हे छापे टाकत ५० जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. १६ जणांना पुणे एटीएसने, २७ जणांना पुणे पोलिस, पुणे ग्रामीण पोलिसांनी २ आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेऊन ही चौकशी केली. दरम्यान, या सर्वांचे मोबाईल जप्त केले. त्यातून त्यांची सोशल मीडिया अकाउंट्स तपासली जात आहेत, अशी माहिती देण्यात आली.

पाकिस्तानस्थित, दहशतवादी कारवाई करणाऱ्या गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी संपर्कात असल्याच्या संशयातून ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्यातील विविध शहरात एटीएसने चार दिवसांपूर्वी पथकांनी छापेमारी करत तब्बल 200 जणांची चौकशी केली होती. गुंड भट्टीच्या संपर्कातील हे संशयित होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून पुणे जिल्ह्यातील ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले. वेगवेगळ्या भागातून त्यांना पकडण्यात आले आहे. एटीएसने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये छापा टाकला.

पाकिस्तानात असलेल्या कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्क असल्याच्या संशयावरून एटीएसने चिपळूणमधील एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सतर्कता

गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुणांची मोठी माहिती हाती लागल्यानंतर एटीएसने कारवाई केली. यावेळी काही संशियत तरुणांची माहिती एटीसने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामिण पोलिसांना देखील दिली आहे. या संशयित तरुणांकडे चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा पोलिस अॅलर्ट झाले असून, त्यांनी देखील या संशयितांची झाडाझडती सुरु केली आहे.

कोण आहे शहजाद भट्टी?

पाकिस्तानमधील लाहोरचा रहिवासी असलेला शहजाद भट्टी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. अंदाजे ४५ वर्षीय भट्टीवर भारतातील दहशतवादी भरती, कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या कारवायांशी संबंधित डझनहून अधिक प्रकरणांचे आरोप आहेत. तो सध्या दुबईतून आपले नेटवर्क चालवतो आणि पाकिस्तान व मध्य-पूर्वेदरम्यान वारंवार प्रवास करतो. मार्च २०२४ मध्ये जालंधरमध्ये युट्युबर रॉजर संधूच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात आणि मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार झीशान अख्तरला भारतातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्याचा सहभाग असल्याचे म्हटले जाते.

Maharashtra ATS ची सर्वात मोठी कारवाई ! पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी संबंधित ११२ संशयित ताब्यात

Web Title: Ats conducts raids at 65 locations in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • ats
  • Pune Police

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा
2

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
3

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
4

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.