crime (फोटो सौजन्य :pinterest)
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका आरोपीने लघवीला जाण्याचा बहाणा केला आणि पोलिसांना गाडी थांबवण्यास सांगितलं होत. यावेळी आरोपीने एका सब इन्स्पेक्टरची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पोलिसांशी झटापट केली असता पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि आरोपी गंभीर जखमी झाला आहे. या आरोपीवर एका मुलीवर सामूही बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग व लव्ह जिहाद प्रकरणातील गुन्हा दाखल आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपीचा नाव फरहान आहे. लव्ह जिहाद प्रकरणात एकूण ५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व एफआयआरमध्ये फरहान आरोपी आहे. भोपाळच्या अशोका गार्डन परिसरातील पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “पोलीस आरोपी फरहानला बिल्किसगंज गावात घेऊन जात होते. जेणेकरून फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या लपण्याच्या ठिकाणाचा शोध घेता येईल. मात्र, आरोपीने त्याला लघवीला जायचं असल्याचं सांगितलं. तेव्हा आरोपीबरोबर एक पोलीस सब-इन्स्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबल खाली उतरले. पण याचवेळी आरोपीने पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झटपट झाली.या चकमकीत पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि आरोपी गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी फरहानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना…
आरोपी फरहान हा भोपाळमधील एका टोळीचा भाग आहे. या टोळीने विद्यार्थिनीला ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच घटनेचे व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत असल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात २५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला असता असं दिसून आलं की, फरहान आणि त्याचे साथीदार प्रामुख्याने भोपाळमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना लक्ष्य करतात. तसेच ते मुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवत असतात. एका पीडितेने फरहानविरुद्ध बलात्कार केल्याचा आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलं आहे.
कोणताही पश्चात्ताप नाही..
या प्रकरणातील आरोपी फरहान सध्या पोलीस कोठडीत आहे. तसेच फरहानसह आणखी पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. चौकशी दरम्यान फरहानला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला कोणताही पश्चात्ताप नसल्याचं म्हटलं आहे.
नागपुरात धारदार शस्त्राने वार करून 35 वर्षीय तरुणाचा खून; शरीरावर आढळल्या अनेक जखमा