arrest (फोटो सौजन्य : pinterest)
गडचिरोली जिल्ह्यतील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापालाच लेकाने संपवलं असून हत्येनंतर मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र भीतीने हादरलेल्या मुलाने नंतर नदीत उडी घेत स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने तो त्यात बचावला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर मुलानेच वडिलांच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
२३ वर्षीय शिक्षिका १३ वर्षाच्या मुलाला घेऊन पळाली, ५ महिन्यांची गर्भवती…. ; नेमकं काय प्रकरण?
पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव रेवनाथ कोडापे (रा. मार्कंडादेव) असे तर आकाश रेवनाथ कोडापे (वय 29) असे आरोपीचे नाव आहे. तर लखन मडावी त्याच्या मित्राचे नाव आहे. वडील रेवनाथची हत्या करून मित्र लखनच्या मदतीने मुलगा आकाशने मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात त्याने केली. मात्र १५ दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली, त्यामुळे आता आपला भांडाफोड होणार या भीतीने आकाशने नदीत उडी घेतली. मात्र सुदैवाने तो वाचला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर मुलानेच वडिलांची हत्येची कबुली दिली. हि खळबळजनक घटना चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे घडली असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात घटनेचा उलगडा झाला असून पोलिसांनी मुलासह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे.
हत्या कशी केली?
वडील रेवनाथ हे मार्कंडादेव येथील देवस्थानच्या यात्री निवासमध्ये मजुरी काम करायचे. मुलगा आकाश हा देखोल मजुरीकाम करायचा आहे. रेवनाथ आणि आकाश मध्ये नेमही वाद होत होते. वडील सतत शिवीगाळ करतात, त्यामुळे आकाशच्या मनात राग होता. त्यातच आकाशने पैसे मागितल्यामुळे वडिलांसोबत त्याचा वाद झाला होता. १५ एप्रिल रोजी दोघांमध्ये वाद झाला आणि तो वाद विकोपाला गेला. या वादात मुलगा आकाशने ओढणीने गळा आवळून वडिलांची हत्या केली. त्यानंतर मित्र लखन मंदावला जीप घेऊन बोलावले. दोघांनी मृतदेह गाडीत टाकून बामनपेठ जंगलात फेकून दिला. दुसर्या दिवशी आकाशने वडील बेपत्ता असल्याची तक्रार चामोर्शी ठाण्यात दिली होती. आता या प्रकरणाचा छडा लागला आहे.