Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

लातूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूर शहरातील माऊलीनगर परिसरात फ्लॅट भाड्याने घेऊन महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2026 | 01:11 PM
लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्...

लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्...

Follow Us
Follow Us:
  • लातूरच्या माऊलीनगरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
  • पोलिसांच्या छाप्यात दोघांना अटक
  • दोन हजारांची रोकड आणि दोन कंडोम पाकिटे जप्त
लातूर : लातूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूर शहरातील माऊलीनगर परिसरात फ्लॅट भाड्याने घेऊन महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली असून, एका पीडित महिलेची सुटका केली आहे. या कारवाईत दोन हजार रुपये आणि दोन कंडोम पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

 

लातूर शहरात आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने माऊलीनगर परिसरातील अंबिका निवास येथील एका फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत वेश्या व्यवसायाचे प्रकरण उघडकीस आले.

फ्लॅट भाड्याने देणाऱ्या महिलेचाही सहभाग असल्याचे समोर

या प्रकरणातील आरोपी जावेद सय्यद हा रूपाली माळी हिने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये बाहेरील जिल्ह्यांतील तसेच लातूर शहरातील महिलांना बोलावून घेत असे. त्यांना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विठ्ठल शिवाजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी ४.५५ वाजता अंबिका निवासमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २ येथे छापा टाकण्यात आला. यावेळी जावेद युसुफ सय्यद (वय ३३, रा. करीम नगर, लातूर) आणि जयश्री राम तोरडे (वय ४०, रा. प्रकाश नगर, लातूर) हे आढळून आले. तसेच नागपूर येथील २१ वर्षीय महिला एका स्वतंत्र खोलीत आढळून आली. पोलिसांनी बनावट ग्राहकाला दिलेल्या दोन हजार रुपयांची रक्कम जावेद सय्यदकडे मिळून आली. तसेच दोन कंडोम पाकिटेही जप्त करण्यात आली. पोलिसांनी पीडित महिलेची विचारपूस करून तिची सुटका केला. या प्रकरणात विष्णू ऊर्फ वैभव हनुमंत पुरी (रा. कवळी, ता. औसा, जि. लातूर) याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले. मात्र, तो घटनास्थळावरून पळून गेला. तसेच फ्लॅट भाड्याने देणारी रूपाली माळी हिचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले असून शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

या पोलिसांनी केली कारवाई

पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजिनाथ पाटील, महिला पोलीस अमलदार सुधामती वंगे, सदानंद योगी, लता गिरी आणि सचिन मुंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लातूरमध्ये वेश्या व्यवसायाचे प्रकरण कुठे उघडकीस आले?

    Ans: लातूर शहरातील माऊलीनगर परिसरातील अंबिका निवास येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार उघडकीस आला.

  • Que: पोलिसांनी या कारवाईत काय केले?

    Ans: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली आणि नागपूर येथील २१ वर्षीय पीडित महिलेची सुटका केली.

  • Que: छाप्यादरम्यान पोलिसांनी काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी बनावट ग्राहकाला दिलेली दोन हजार रुपयांची रोकड आणि दोन कंडोम पाकिटे जप्त केली. तसेच या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

Web Title: The police have carried out a major operation by raiding a flat in latur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur news

संबंधित बातम्या

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला
1

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना
2

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन
3

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा
4

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.