Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

गावकऱ्यांनी पाठलाग करून तीन दरोडेखोरांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. जळगाव तालुक्यातील भोकर येथे शनिवारी दुपारी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2026 | 12:20 PM
चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्...; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्...; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

Follow Us
Follow Us:
  • भोकर येथील स्टेट बँकेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
  • चादरी विक्रेत्यांच्या वेशात आरोपींकडून बँकेची रेकी
  • गावकऱ्यांच्या सतर्कतेने पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : गावात चादरी विक्रीचा बहाणा करून फिरणारे तरुण प्रत्यक्षात बँक लुटण्याच्या तयारीत असल्याची कुणालाही कल्पना नव्हती. बँकेच्या कामकाजावर पाळत ठेवली, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीची वेळ साधली आणि अचानक बंदुकीच्या धाक दाखवून थेट स्टेट बँकेच्या स्ट्राँग रूमकडे मोर्चा वळवला. काही क्षणांतच बँकेत एकच गोंधळ उडाला. मात्र, दरोडा टाकून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या या सशस्त्र टोळीला गावकऱ्यांच्या सतर्कतेने मोठा धक्का बसला. गावकऱ्यांनी पाठलाग करून तीन दरोडेखोरांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. जळगाव तालुक्यातील भोकर येथे शनिवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा टाकण्यासाठी सात ते आठ जणांची टोळी काही वेळापासून टेहळणी करीत होती. गावात काही तरुण चादरी विक्रीसाठी फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे कुणाचे विशेष लक्ष गेले नाही. मात्र, याच चादरी विक्रेत्यांच्या वेशातील तरुणांच्या मनात बॅंक लुटण्याचा डाव शिजत असल्याचे नंतर उघड झाले. बँकेतील कर्मचाऱ्यांची जेवणाच्या सुट्टीसाठीची वेळ साधत टोळीने अचानक बँकेत प्रवेश केला. हातात शस्त्रे आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांना एका जागी रोखून धरले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. त्यानंतर दरोडेखोरांनी स्ट्रॉग रूममधील लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बिस्किटांसह दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. हाताला लागेल तेवढी रोकडही बॅगांमध्ये भरण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

पळून जाण्याच्या प्रयत्नात गावकऱ्यांचा प्रतिकार

बँकेतील गोंधळाची माहिती बाहेर येताच गावकऱ्यांना संशय आला. चादरी विक्रीच्या बहाण्याने गावात फिरणारे तरुणच या दरोड्यात सहभागी असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी दरोडेखोर आणि गावकऱ्यांमध्ये झटापट झाली. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिघांना गावकऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना

पोलिसांकडून चौकशी सुरू; चार जण ताब्यात

भोकर येथील स्टेट बॅंक दरोडा प्रकरणात धरणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत धडाकेबाज कारवाई करत चावलखेडा रेल्वे बोगद्याजवळ दोन संशयितांना बेड्या ठोकल्या, शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मुक्ताईनगर, सध्या जळगाव) आणि गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. नायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना पकडले. त्यांच्याकडून संशयास्पद बॅगा जप्त करण्यात आल्या असून, त्यात दरोड्यातील रोकड किवा सोन्याचे दागिने असण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या मदतीने यापूर्वी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगावमध्ये बँक दरोड्याची घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव तालुक्यातील भोकर गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शनिवारी दुपारी दरोड्याचा प्रयत्न झाला.

  • Que: दरोडेखोरांनी बँकेत कशा प्रकारे प्रवेश केला?

    Ans: आरोपी चादरी विक्रेत्यांच्या वेशात गावात फिरत होते. त्यांनी बँकेची रेकी करून कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीची वेळ साधत बंदुकीचा धाक दाखवून बँकेत प्रवेश केला.

  • Que: या प्रकरणात किती संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले?

    Ans: गावकऱ्यांनी सुरुवातीला तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले. दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Web Title: The police have arrested the accused who attempted to rob a bank nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना
1

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन
2

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा
3

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ
4

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.