Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावकीतील वाद टोकाला; डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

कोळपेवस्ती येथील देवाच्या मंदिरात धनगर समाजाचा वार्षिक देवकार्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान जवळच्या भावकीतील दादा कोळपे आणि शहाजी कोळपे यांच्यात जेवणावरून किरकोळ वाद झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 10, 2025 | 02:49 PM
भावकीतील वाद टोकाला; डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

भावकीतील वाद टोकाला; डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

शिरुर : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील परिसरातील कोळपेवस्ती येथे देवकार्य आणि खेळाच्या कार्यक्रमानंतर भावकीत किरकोळ वाद झाला. या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी 14 जणांसह 5 ते 6 अनोळखी इसमांविरुद्ध मारहाण व धमकी देऊन जीव घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिरूर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी तात्या भाऊसो कोळपे (वय 30, रा.कोळपेवस्ती -मांडवगण फराटा, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, ही घटना बुधवारी (ता.8) रात्री साडेआठच्या सुमारास गणेश लॉन्स जवळ घडली. कोळपेवस्ती येथील देवाच्या मंदिरात धनगर समाजाचा वार्षिक देवकार्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान जवळच्या भावकीतील दादा कोळपे आणि शहाजी कोळपे यांच्यात जेवणावरून किरकोळ वाद झाला. त्यानंतर तो वाद मिटवण्यात आला. मात्र, रात्री घरी परतल्यानंतर तोच वाद पुन्हा पेटला.

हेदेखील वाचा : चौघांनी तरुणाला भररस्त्यात गाठले, डोक्यात बाटली घातली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे यांच्यासह 13 ते 14 जणांनी तात्या कोळपे यांच्या घरासमोर येऊन, ‘तू देवाच्या कार्यक्रमात आमच्याशी वाद का घातलास? तुला जास्त माज आला आहे का?’ असे म्हणत दादा कोळपे यांनी कोयत्याने तात्या कोळपे यांच्या डोक्यावर वार केला.

यावेळी तात्या कोळपे यांना वाचवण्यास परसराम कोळपे धावले असता, त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. दरम्यान, गंगाराम कोळपे, साळुबाई कोळपे व इतर नातेवाईक आवाज ऐकून बाहेर आले. तेव्हा मनोज कोळपे याने तलवारीसदृश हत्याराने गंगाराम कोळपे यांच्या डोक्यावर वार केला. शहाजी कोळपे यांनी धुळा कोळपे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर केला. तसेच महिलांनाही दगड व हातांनी मारहाण केली.

जखमींना रुग्णालयात करण्यात आले दाखल

जखमींना तत्काळ वरदविनायक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी जात असताना भिवा कोळपे यांच्यावर पुन्हा पांढऱ्या कारमधून पाठलाग करून सोन्या उर्फ तुशार खैरे (रा.शिरसगाव काटा, ता.शिरूर,जि.पुणे) याने चाकूने हल्ला केला. इतकेच नव्हे तर आरोपींनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन मनिषा कोळपे यांना पोटात लाथ मारून दुखापत केली. त्यामुळे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, भैरू कारभारी कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे, बाबुराव विठ्ठल कोळपे, धुळा विठ्ठल कोळपे, सिद्धेश्वर शिवाजी कोळपे, शिवाजी कारभारी कोळपे, धुळा बाबू थोरात, भिवा बाबू थोरात, सोन्या उर्फ तुषार खैरे व दोन महिलांसह इतर 5 ते 6 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरूर पोलिस करत आहेत.

Web Title: Attempted murder by stabbing in the head with a sickle incident in shirur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • crime news
  • Shirur Crime
  • Shirur News

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
2

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.