संग्रहित फोटोे
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांत भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी नागरिक पोलिसांकडे करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काचेची बाटलीही फेकून मारून तरुणाला जखमी केले आहे.
ही घटना ७ ऑक्टोबरला रात्री अकराच्या सुमारास कात्रजमधील तनिष्क रेस्टो बारसमोर घडली आहे. यश उर्फ धोंडिबा ढेबे, सोन्या ढेबे, दादया ढेबे याच्यासह अन्य साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विठ्ठल जानकर (वय २३ रा. आंबेगाव पठार) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सागर जानकर आणि आरोपी यांच्यात वादविवाद झाले होते. त्याच रागातून ७ ऑक्टोरबरला रात्री अकराच्या सुमारास चौघा जणांनी सागरला रेस्टो बारजवळ गाठले. तुला बघून घेतो आज, नेमका सापडलास असे म्हणून सागरच्या डोक्यात काचेची बाटली मारली. त्याचवेळी सुरक्षारक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, टोळक्याने त्याच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करीत आहेत.
मंत्र्याच्या एका सहीनं गुंड घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना
कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. तरीही राज्याच्या गृह खात्याकडून २० जून २०२५ रोजी त्याला परवाना देण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे समोर आले आहे. यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणात सचिन घायवळ हा स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातून तो निर्दोष सुटला असला, तरी घायवळ टोळीत तो नीलेश घायवळनंतर दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.