(फोटो सौजन्य: istock)
Ashok Kharat Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त
मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडल्यानंतर आता आरोग्य विभागाने रुग्णालयाने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयाला पूर्णपणे सील करुन या प्रकरणाची सखोल चाैकशी केली जात आहे. बेनीगंज येथील सुरेश यादव यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नी सोनिया यादव यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर मा परमेश्वरी देवी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करणाऱ्या डॉक्टर अंजली श्रीवास्तव यांनी सुरुवातीला त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले होते. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नव्हते आणि प्रसूतीदरम्यान डॉक्टरांकडून फोनवरून सूचना घेत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने प्रसूती प्रक्रिया पार पाडली.
कुटुंबियांनी सांगितले की, सुमारे अर्ध्या तासानंतर कर्मचाऱ्यांनी बाळ हातात देऊन सांगितले की, त्याचा श्वास थांबला आहे. त्यांनी जेव्हा बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखवले तेव्हा बाळाला तिथे मृत घोषित करण्यात आला. यानंतर मूळ रुग्णालयात परतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पत्नीचीही अवस्था खालावत चालल्याचे सांगितले. तिलाही जेव्हा दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबियांनी दावा केला आहे की, प्रसुतीच्या वेळी रुग्णालयात एकही पात्र डाॅक्टर उपस्थित नव्हता. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा आणि आईचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी रुग्णालयावर केला.
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
या घटनेमुळे नातेवाईक आणि स्थीनिका नागरिकांद्वारे रुग्णालयावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. योग्य वेळी, योग्य वैदकीय उपचार मिळाले असते तर आई आणि बाळाचा जीव वाचू शकला असता. परंतु डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही अनर्थ घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा डाॅक्टरांची उपस्थिती आणि आरोग्य सेवांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान अयोध्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.






