
crime (फोटो सौजन्य: social media)
Beed Crime: ‘कार्यक्रम ओके’ कॉलने उलगडलं हत्याकांड; प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
कसा झाला अपघात?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तथा मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे हे दुचाकीवरून बिलोली परिसरातून आदर्श जात होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर उडाण पुलावरून आदर्श नगरच्या दिशेने येत असतांना एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राजेश शेटे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शेटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैधकीय उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
CCTV मध्ये कैद थरार
कारने धडक दिल्यांनतर तो तिथून फरार झाला. या प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे बदलापूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस तपास सुरु
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनांची ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे. वाहनाचा क्रमांक आणि चालकाचा माग काढण्यासाठी तपास करण्यात येत आहे. लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव
ठाणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा त्याच्या आईच्या प्रियकराने अमानुष मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने मुलाला इतक्या क्रूरतेने मारहाण केले की त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला मात्र पोलिसांनी तपास करत याचा छडा लावला. ही घटना ठाण्यातील काश्मीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Ans: बदलापूर पूर्व येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर हा अपघात घडला.
Ans: मनसेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे गंभीर जखमी झाले.
Ans: संपूर्ण अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे.