अक्षय शिंदेचं 3 डॉक्टरांच्या उपस्थितीत पोस्टमार्टेम पूर्ण, मृतदेहाचं पुढे काय होणार? (फोटो सौजन्य-X)
बदलापूरमधील दोन अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात राजकारण तापले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून ही एसआयटी डीसीपींच्या नेतृत्वाखाली तपास करणार आहे. आता या एन्काउंटरबाबत ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं ते सांगितले. याचदरम्यान आता अक्षय शिंदेंच्या पोस्टमार्टेम संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तपासानिमित्त सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात असताना, अक्षयने एका पोलिसाचे रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही अक्षयवर गोळीबार केला. या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे पोलिसांकडून देण्यात आली.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांसह पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पोलीस अधिकारी आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पथक आरोपीला त्याच्या अटकेसाठी ट्रान्सफर वॉरंटसह तळोजा मध्यवर्ती कारागृहात घेऊन गेले. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शिंदे याला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आणि सायंकाळी 6 च्या सुमारास त्याला ठाण्यात आणले जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.15 च्या सुमारास पोलिसांचे वाहन मुंद्रा बायपासवर आले असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलिस अधिकारी सपोनी/नीलेश मोरे यांच्या कंबरेतून सर्व्हिस पिस्तूल काढले आणि पोलिस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले, त्यापैकी एक सपोनी/निलेश मोरे नीलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला मार लागला असून आणखी दोन राऊंड फायर करण्यात आले आहेत. स्वसंरक्षण पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीच्या दिशेने गोळी झाडल्याने आरोपी अक्षय अण्णा शिंदे हा जखमी झाला.
पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस अधिकारी सपोनी/निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणले. तेथे अक्षय शिंदेचा शवविच्छेदनानंतर मृत घोषित करण्यात आले. अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे मुंबईतील सर जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 3 डॉक्टरांच्या उपस्थितीत अक्षय शिंदेंचे शवविच्छेदन पूर्ण झाले. यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह हा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, मुंबई पोलिसांनी अक्षय शिंदेचे शव हे जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. आम्हाला पेपर मिळताच आम्ही पोस्टमार्टम सुरू करणार आहे. पोस्टमार्टम करताना तीन डॉक्टर उपस्थित असतात. या केसमध्ये देखील तीन डॉक्टर उपस्थित असणार आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार पोस्टमार्टमचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार आहे. त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.