
मंदिरातच घडला दुहेरी हत्याकांडाचा थरार! पुजाऱ्याने अंकित-इसरारला मारून पुरले, नंतर तिथेच लावली धुनी
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
मुकेश आणि इसरारची हत्या
मृतांची ओळख चंदीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोली तागा येथील रहिवासी, दिव्यांग मुकेश यांचा २७ वर्षीय मुलगा अंकित आणि त्याचा मित्र, रिडकू यांचा ३४ वर्षीय मुलगा इसरार, अशी पटली आहे. २४ जुलै रोजी ते बाईकने खेकरा इथे जात आहेत असं सांगून घरातून निघाले आणि परत घरी आलेच नाही. अंकितची बहिण भावनाने चांदीनगर पोलस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली ज्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला.पोलीस तपासात लहाचौरा गावातील श्री गणेश भगवान मंदिराचे पुजारी नरेश नाथ यांचे नाव समोर आले.
अंकितच्या बहिणीसोबत पुजाऱ्याचे अनैतिक संबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेथ नाथ सुरुवातीला सिंगोली तागा येथील शिव मंदिरात राहत होता. तिथे गावकऱ्यांनी केलेल्या विरोधानंतर तो लहाचौरा मंदिरात राहू लागला. अंकितच्या बहिणीचे कथितरित्या त्याच्यासोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर दोघांचे फोटोज व्हायरल झाले होते. अंकितला या नात्याचा स्वीकार नव्हता ज्यामुळे आपला विरोध दर्शवण्यासाठी तो मित्र इसरारसोबत मंदिरात गेला.
आरोपीने २५ जुलै रोजी मंदिरातच दोन्ही मित्रांना चहा प्यायला दिला होता ज्यात विषारी पदार्थ मिसळण्यात आले होते. दोघांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाला मंजिर परिसरातच गाढण्यात आले आणि मग त्यावर टाईल्स बसवल्या जेणेकरुन कुणाला संशय येऊ नये. आरोप आहे की हत्येनंतर पुजारी मंदिरात धुनी लावून फिरत होता.
या प्रकरणात नरेश नाथ त्याचा अल्पवयीन मुलगा, उज्ज्वल पांचाल आणि कृष्णा यादव अशी चार नावे समोर येत आहेत. लिसांनी उज्ज्वल पांचाल आणि कृष्णा यादव या दोन आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी पुजारी आणि त्याचा मुलगा फरार आहेत. पोलिस दोघांचाही तपास करत असून हत्येमागचे नेमके कारण आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुटुंबाने पोलिसांवर आरोप लावला केला आहे की, सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि सर्विलंस तपासणीनंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. कांवड मेळाव्यादरम्यान वातावरण खराब होऊ नये यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक तत्काळ घटनेचा खुलासा केला नाही. कुटुंबाने असाही आरोप लावला की, पोलिसांनी पुजाऱ्यासोबत इतर आरोपांनाही ताब्यात घेतले होते पण चाैकशीनंतर त्यांची जाणीवपूर्वक सुटका करण्यात आली. तथापि पोलिसांनी या दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.