संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना सतत घडत आहे. वाढत्या गुन्हेगारीला पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक केली.
राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजू इककळकी बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात थांबला होता. आरोपी राजू याचा ओळखीचा आहे. आरोपी प्रेम याने त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले. पण, त्याने दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन राजू याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपीने त्याला दगडाने मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या प्रेमला पोलिसांनी अटक केली असून, सहायक निरीक्षक शेळके तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : चाकणमधील उद्योजक आक्रमक; 15 ते 30 दिवसांत एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीची मागणी
पुण्यात तरुणाचा खून
पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



