Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: बांगलादेशी नागरिकांचा नवी मुंबईमध्ये तळ! १०० हून अधिक संशयित ताब्यात, ७० हून अधिक महिलांचा समावेश

Navi Mumbai Bangladeshi Arrest: नवी मुंबईतील खारघर येथील हायड पार्क सोसायटीत पोलिसांनी मोठी कारवाई करत १०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे, ज्यात ७० हून अधिक महिलांचा समावेश आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 26, 2025 | 10:06 PM
बांगलादेशी नागरिकांचा नवी मुंबईमध्ये तळ! १०० हून अधिक संशयित ताब्यात (Photo Credi t- X)

बांगलादेशी नागरिकांचा नवी मुंबईमध्ये तळ! १०० हून अधिक संशयित ताब्यात (Photo Credi t- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • नवी मुंबई हादरली!
  • १०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिक ताब्यात
  • बनावट आधार कार्ड प्रकरणी पोलिसांची कसून चौकशी
नवी मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर भागात बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत १०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये ७० हून अधिक महिला आहेत, ज्या परिसरातील वेगवेगळ्या घरांमध्ये घरकामगार म्हणून काम करत होत्या.

हायड पार्क सोसायटीत मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई सकाळी साडेदहाच्या सुमारास सेक्टर-३५ मधील ‘हाईड पार्क सोसायटी’ मध्ये सुरू झाली. मोठ्या पोलीस दलासह आलेल्या पथकाने सोसायटीमधील प्रत्येक फ्लॅट आणि घराची कसून तपासणी केली. पकडलेल्यांपैकी बहुतेकांकडे आधार कार्ड असले तरी, त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणताही वैध दस्तावेज मिळाला नाही. ही सर्व आधार कार्ड्स बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने बनवल्याचा पोलिसांना संशय आहे.

हे देखील वाचा: Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?

कसून चौकशी सुरू

हिरासतत घेतलेल्या या लोकांना तत्काळ खारघर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्यांची ओळख (नाव-पत्ता), वय, तसेच ते भारतात कधी आणि कसे आले, याबद्दल संपूर्ण चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, हे सर्व लोक अवैध मार्गाने भारतात राहत होते आणि बहुतेक जण बांगलादेशातून आले होते.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “खारघर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती (इनपुट) आम्हाला आधीच मिळाली होती. ही कारवाई त्याच माहितीवर आधारित आहे. आम्ही या सर्वांची ओळख आणि कागदपत्रांची कसून तपासणी करत आहोत.”

घरमालकांवरही कारवाईची शक्यता

पोलिसांनी आता या लोकांना फ्लॅट भाड्याने देणाऱ्या मकान मालकांना आणि सोसायटीच्या सेक्रेटरी-सदस्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात आणले आहे. पोलीस व्हेरिफिकेशन न करता या लोकांना भाड्याने का ठेवले, याची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यावर सर्व अवैध नागरिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांना देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई नवी मुंबई पोलिसांच्या अवैध स्थलांतरितांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग आहे.

हे देखील वाचा: सलूनच्या नावाखाली लपूनछपून सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकली अन् भांडाफोड झाला

Web Title: Bangladeshi nationals camped in navi mumbai more than 100 suspects detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Bangladeshi Arrested
  • kharghar
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा
1

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

तब्बल 17 वर्षांनंतर नवी मुंबईला मिळणार महिला महापौर; आरक्षण सोडतीत महिला राखीव पद
2

तब्बल 17 वर्षांनंतर नवी मुंबईला मिळणार महिला महापौर; आरक्षण सोडतीत महिला राखीव पद

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष
3

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार
4

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.