Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष

भाजपा पक्षाने अखेर निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवारांना न्याय दिला नाही. याचकारणाने संपूर्ण बौद्ध समाजाची नाराजी आशा आशयांचे बॅनर सध्या कामोठे वसाहतील लावण्यात आले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 20, 2026 | 04:49 PM
Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष
Follow Us
Close
Follow Us:
  • “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”
  • अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष
पनवेल ग्रामीण : महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई आणि राज्यातील इतर महानगरपालिकेवर महायुतीने आपली सत्ता काबीज केली. मात्र या सगळ्यात रिंगणात भाजपावर ताशेरे ओढले जाणारे बॅनर नवी मुंबईत अज्ञातांनी लावले.

भाजपा पक्षाने अखेर निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवारांना न्याय दिला नाही. याचकारणाने संपूर्ण बौद्ध समाजाची नाराजी आशा आशयांचे बॅनर सध्या कामोठे वसाहतील लावण्यात आले आहेत. अनामिक नावाने लावण्यात आलेले हे बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने कामोठे वसाहतीत बौद्ध समाजाच्या उमेदवारांना निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व दिले नाही असा आरोप या बॅनरमध्ये केला.

BMC Mayor : महायुतीचा वाद पोहचला दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची थेट वरिष्ठांकडे तक्रार

या बॅनर बाबत अधिक माहिती घेण्यासाठी भाजपासोबत युती करून निवडणूक लढलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष ऍड. मंगेश धिवार यांच्याशी संपर्क साधला. हा खोडसाळपणा करण्यासाठी आणि भाजपा आणि बौध्द समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कोणीतरी हे बॅनर लावले आहेत. भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या बौद्ध समाजाच्या उमेदवारांना पडण्याचं काम आशा प्रकारच्या प्रवृत्तींनी केले असल्याचे वक्तव्य केले आहे.

कामोठे वसाहतीमधील प्रभाग 12 मधील अनुसूचित जातीसाठी राखीव जागेकरिता आरपीआय पक्षाच्या प्रभाकर कांबळे यांना भाजपाच्या कमळ चिन्हावर उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 11 मधील अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी राखीव जागेवर नीलम मोहिते, प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुसूचित जातीच्या महिला उमेदवा्रांसाठी राखीव जागेवर भाजपाकडून हेमलता गोवारी यांना उतरविण्यात आले होते. यापैकी प्रभाग क्रमांक 13 मधील हेमलता गोवारी वगळता भाजपाच्या इतर दोन्ही उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपा उमेदवारांचा पराभव झाला असला तरी या ठिकाणी विरोधात विजयी झालेले उमेदवार अनुसूचित जातीतीलच आहेत, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान हे सगळं भाजपाच्या विशेषत: महायुतीच्या विरोधात केलेलं कटकारस्थान असल्याचं महायुतीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

BMC Mayoral Suspense: आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम

Web Title: Navi mumbai news bjp did not do justice to the buddhist community banner put up by unknown persons attracts attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • BJP
  • Navi Mumbai
  • political news

संबंधित बातम्या

BMC Mayor : महायुतीचा वाद पोहचला दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची थेट वरिष्ठांकडे तक्रार
1

BMC Mayor : महायुतीचा वाद पोहचला दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची थेट वरिष्ठांकडे तक्रार

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…
2

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…

‘मुंबईत उद्धव ठाकरेंनी महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा द्यावा’; ‘या’ OBC नेत्याची मागणी
3

‘मुंबईत उद्धव ठाकरेंनी महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा द्यावा’; ‘या’ OBC नेत्याची मागणी

ZP Election 2026 : कोल्हापुरात रणसंग्राम; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चिन्हे,जनता दल, भाजपा युतीचे संकेत
4

ZP Election 2026 : कोल्हापुरात रणसंग्राम; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चिन्हे,जनता दल, भाजपा युतीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.